शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

'प्रिय राहुल गांधी, तुमची इच्छा पूर्ण झाली...', 'त्या' वक्तव्यावरुन भाजपची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 20:33 IST

काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी एक वक्तव्य केले होते. जाणून घ्या काय म्हणाले होते...

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. केरळमधील वायनाड येथून ते लोकसभेचे खासदार होते. मानहानीच्या खटल्यात सुरत न्यायालयाने निकाल दिला आणि त्यानंतर लोकसभेच्या सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. या निर्णयामुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेसकडून या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहेत. त्याचबरोबर राहुल यांना आम आदमी पक्षापासून ते तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकपर्यंत अनेकांचा पाठिंबा मिळत आहे.

या सगळ्यात भाजपने राहुल गांधींना 'मी दुर्दैवाने खासदार आहे!' या वक्तव्याची आठवण करुन दिली आणि खोचक टोलाही लगावला. कर्नाटक भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट केले की, "प्रिय राहुल गांधी, तुमची इच्छा पूर्ण झाली! काही दिवसांपूर्वी तुम्ही दुर्दैवाने खासदार असल्याचे मान्य केले होते! आता न्यायालयाच्या निर्णयाने तुमची इच्छा सत्यात उतरली आहे," असा टोला भाजपने लगावला.

काय म्हणाले होते राहुल गांधी?परदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर राहुल गांधी यांनी 16 मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन भाजपला प्रत्युत्तर दिले होते. पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले होते की, त्यांना भाजपच्या आरोपांना सभागृहात उत्तर द्यायचे आहे. पण त्यांना संसदेत बोलू दिले जाईल, असे वाटत नाही. राहुल पुढे म्हणाले, दुर्दैवाने मी एक खासदार आहे आणि मला आशा आहे की मला संसदेत बोलू दिले जाईल. 

यादरम्यान बाजुला बसलेल्या जयराम रमेश यांनी राहुल गांधींची 'दुर्दैवाने' चूक पकडली आणि तात्काळ राहुल यांना रोखून चुक सुधारण्यास सांगितले. यावेळी माईकमध्ये जयराम रमेश काय म्हणाले, ते स्पष्टपणे ऐकू आले. "तुम्ही दुर्दैवाने मी खासदार आहे म्हणालात. यावरुन ते तुमची खिल्ली उडवू शकतात," असे जयराम रमेश त्यावेली म्हणाले. यानंतर राहुल यांनी आपली चुक सुधारली आणि आपला मुद्दा पुढे सुरू ठेवला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाKarnatakकर्नाटकcongressकाँग्रेस