शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! पोलिसांनी कचऱ्याच्या गाडीतून नेला शेतकऱ्याचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 09:09 IST

Farmers Dead Body Garbage Cart: पोलीस आणि कर्मचाऱ्यांकडून मृतहेदांवरील अंत्यसंस्कारांदरम्यान असंवेदनशीलता दाखवत असल्याचे वारंवार दिसून येत आहेत.

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये सरकार आणि प्रशासनाकडून मृतदेहांवर पूर्ण प्रोटोकॉलप्रमाणे आणि पूर्ण सन्मानासह अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले जात आहेत. मात्र असे असतानाही पोलीस आणि कर्मचाऱ्यांकडून मृतहेदांवरील अंत्यसंस्कारांदरम्यान असंवेदनशीलता दाखवत असल्याचे वारंवार दिसून येत आहेत. आता एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह हा कचऱ्याच्या गाडीतून नेल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे. (Farmers Dead Body Garbage Cart Viral Video In Uttar Pradesh)

हा संतापजनक प्रकार उत्तर प्रदेशमधील बुंदेलखंड विभागातील महोबा जिल्ह्यात घडला आहे. बुंदेलखंडमधील महोबामध्ये पोलिसांनी एका शेतकऱ्याच्या मृतदेहासोबत हे अपमानास्पद वर्तन केले. खरेला परिसरात राहणारे शेतकरी रामकरण यां ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. प्रकृती बिघडल्याने त्यांचा मुलगा त्यांना रुग्णालयात घेऊन आला. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कोरोनाकाळात संशयास्पद मृत्यू झाल्याने रुग्णालयाने पूर्ण खबरदारी घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना दिली गेली. पोलिसांनी पंचनामा केला. मात्र धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी या शेतकऱ्याचा मृतदेह कचऱ्याच्या गाडीतून पोस्टमार्टेमसाठी नेला. या संदर्भातील एक व्हिडीओ समोर आला असून, दोन पोलीस कर्मचारी पॉलिथिनमध्ये गुंडाळलेला मृतदेह कचऱ्याच्या गाडीत ठेवताना दिसत आहेत. आथा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानित एएसपी आर. के. गौतम यांनी चरखारी परिसातील सी.ओ.के. यांना या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.   दरम्यान, उत्तर प्रदेशमधील बलरामपूर येथूनही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये दोन व्यक्ती एक मृतदेह पुलावरून नदीत फेकताना दिसत आहेत. हा व्हिडीओ २८ मे रोजीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या प्रेमनाथ मिश्र यांचा मृतदेह राप्ती नदीत फेकल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यामध्ये प्रेमनाथ यांचा पुतण्या संजय शुक्ल आणि त्याला मदत करत असलेला सफाई कर्मचारी मनोज कुमार यांचा समावेश आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या