शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

...तर मी नालायक आहे- शिवराजसिंह चौहान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 10:52 IST

कमलनाथ यांच्या टीकेला चौहान यांचं प्रत्युत्तर

भोपाळ: मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला होता. कमलनाथ यांनी शिवराजसिंह चौहान यांना नालायक म्हटलं होतं. या टीकेला आता चौहान यांना उत्तर दिलंय. विशेष म्हणजे कमलनाथ यांच्या टीकेला उत्तर देताना शिवराज यांनी डझनभरवेळा नालायक या शब्दाचा वापर केला. राज्यातील गरिब जनतेसाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विविध योजनांची घोषणा केली. यावेळी बोलताना त्यांनी कमलनाथ यांच्या टीकेला उत्तर दिलं. 'होय, आम्ही नालायक आहोत. कारण आम्ही वसाहती वैध ठरवल्या. होय, आम्ही नालायक आहोत. कारण आम्ही अवघ्या एका रुपयात गरिबांना गहू देतो,' अशा शब्दांमध्ये चौहान यांनी कमलनाथ यांना प्रत्युत्तर दिलं. राज्यातील अवैध वसाहती वैध ठरवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर चौहान पत्रकारांशी बोलत होते. कमलनाथ यांच्या टीकेचा चौहान यांनी जोरदार समाचार घेतला. 'आम्ही गरिबांवर उपचार करतो, त्यामुळे आम्ही नालायक झालो. योजना खूप चांगली आहे. मात्र तरीही ते आम्हाला नालायक म्हणताहेत,' असं चौहान यांनी म्हटलं. कमलनाथ यांना चौहान यांच्या सोबतच्या मैत्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला 'काही मित्र लायक असतात, तर काही मित्र नालायक असतात,' असं उत्तर दिलं होतं. कमलनाथ यांनी केलेलं हे विधान सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं. कमलनाथ यांच्या टीकेला चौहान यांनी ट्विटरदेखील उत्तर दिलं होतं. यावेळी त्यांनी भाजपचं निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाचा उल्लेख करत कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला होता. 'फक्त कमळ महत्त्वाचं आहे. आम्ही सर्वांचा आदर करतो आणि फक्त कमळ हे फूल महत्त्वाचं असल्याचं मानतो,' असं ट्विट चौहान यांनी केलं होतं.  

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराजसिंह चौहानMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा