शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

त्या दिवशी कोणाची तरी हत्या होणार होती, सापडला प्रद्युम्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2017 9:41 AM

भोंडसीमधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या प्रद्युम्न ठाकूरच्या हत्याप्रकरणाने वेगळं वळण घेतलं आहे.

ठळक मुद्देभोंडसीमधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या प्रद्युम्न ठाकूरच्या हत्याप्रकरणाने वेगळं वळण घेतलं आहे. रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एकाची हत्या निश्चित होती.

गुरूग्राम- भोंडसीमधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या प्रद्युम्न ठाकूरच्या हत्याप्रकरणाने वेगळं वळण घेतलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी शाळेतील अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं. शाळेच्या परीक्षा आणि शिक्षक-पालक मिटिंग पुढे ढकलण्यासाठी या विद्यार्थ्याने हत्येचा कट रचला. आरोपी विद्यार्थ्यांने सीबीआयला ही संपूर्ण माहिती दिली. या हत्या प्रकरणातील सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे 8 सप्टेंबर रोजी रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये एकाची हत्या निश्चित होती. शाळेच्या परीक्षा आणि शिक्षक-पालक मिटिंग पुढे ढकलण्यासाठी काही ठोस कारण हवं, ज्यामुळे शाळाच बंद राहील, असा विचार करून आरोपीने शाळेत चाकू आणला होता. त्या दिवशी शाळेत कोणाची तरी हत्या होणार, हे निश्चित होतं, असं सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. प्रद्युम्न त्या दिवशी चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी सापडला म्हणूनच त्या चिमुरड्याने जीव गमावल्याचं सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हंटलं. टाइम्स ऑफ इंडियाने ही सविस्तर माहिती दिली आहे. 

8 सप्टेंबर रोजी सकाळी शाळेत आल्यावर प्रद्युम्न त्याच्या पाचवीत शिकणाऱ्या मोठ्या बहिणीला बाय केल्यानंतर त्याच्या वर्गात गेला. त्यानंतर तो शौचालयात गेला. त्याचवेळी ही संपूर्ण घटना घडली. 'मी पूर्णपणे ब्लॅन्क झालो आणि कृत्य केलं', अशी कबुली आरोपीने तपासादरम्यान दिल्याचं सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. हत्येच्या वेळी वापरलेला चाकू पोलिसांना घटनास्थळी सापडला होता. त्या चाकूची आरोपीच्या वर्गमित्रांकडून आणि शिक्षकांकडून पडताळणी करण्यात करण्यात आली. प्रद्युम्नची हत्या करण्याच्या दोन दिवस आधी त्याने तो चाकू शाळेत आणला होता का, याचाही तपास झाला. 

8 सप्टेंबर रोजी आरोपी चाकू घेऊन शौचालयाच्या बाजूला असणाऱ्या गॅलेरीमध्ये उभा राहून कोणी येत का? त्याची वाट पाहत होता. त्याचवेळी प्रद्युम्न तेथे आला आणि आरोपीने त्याला टार्गेट केल्याचं सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितलं. सुत्रांच्या माहितीनुसार, आरोपी अभ्यासात हुशात नव्हता तसंच तो नेहमी शाळेला सुट्टी घ्यायचा. अभ्यासात हुशार नसला तरी तो उत्तम पियानो वाजवायचा. वर्गात न बसता तो शाळेतील म्युझिक रूममध्ये बसलेला असायचा. पियानो वाजविण्याची उत्तम कला असल्याने तो शाळेत प्रसिद्ध होता. आरोपीची विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या प्रसिद्धीमुळे प्रद्युम्न सहजपणे त्याच्याबरोबर शौचालयात गेला असावा, असा अंदाज वर्तविला जातो आहे.  

टॅग्स :Ryan International Schoolरेयान इंटरनॅशनल स्कूलMurderखून