शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

"तुझी हत्या होणार आहे", दाऊद गँगची भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 13:25 IST

Sadhvi Pragya Thakur : प्रज्ञा ठाकूर यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भोपाळ : आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. प्रज्ञा ठाकूर यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राजधानी भोपाळमधील टीटी नगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत प्रज्ञा ठाकूर यांना दाऊद टोळीचा उल्लेख करून धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा माणूस म्हणून दिली आहे. तसेच, त्याने 'तुझी हत्या होणार आहे', असे सांगितले आहे. 

प्रज्ञा ठाकूर यांच्यासोबत असलेल्या या संभाषणाचा व्हिडिओ सुद्धा लोकांनी रेकॉर्ड केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या या प्रकरणाबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की, हा कॉल कोणत्या नंबरवरून आला, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर गेल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत.

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे साध्वीने केले समर्थनसाध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केले होते. या प्रकरणात त्यांनी भारत हिंदूंचा असल्याचे म्हटले होते. पाखंड्यांनी नेहमीच असे केले आहे. चित्रपट बनवून हिंदूंच्या देवी-देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत सनातन येथे राहणार असून त्याला जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपली आहे, असे त्यांनी म्हटले होते.

टॅग्स :Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपा