दाऊदला भारताच्या हवाली करा
By Admin | Updated: December 28, 2014 01:12 IST2014-12-28T01:12:31+5:302014-12-28T01:12:31+5:30
दाऊद इब्राहिम अद्यापही कराचीतच असल्याचा दावा पश्चिमी गुप्तचर संस्थेने केल्यानंतर त्याला आमच्या हवाली करा, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे पुन्हा एकदा केली.

दाऊदला भारताच्या हवाली करा
पाककडे पुन्हा मागणी
नवी दिल्ली/लखनौ : अंडरवर्ल्ड डॉन आणि सन १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार दाऊद इब्राहिम अद्यापही कराचीतच असल्याचा दावा पश्चिमी गुप्तचर संस्थेने केल्यानंतर त्याला आमच्या हवाली करा, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे पुन्हा एकदा केली. दोन महिन्यांपूर्वी दाऊद आणि दुबईतील त्याचा एक सहकारी जमीन व्यवहारासंदर्भात बोलत असल्याचे संभाषण गुप्तचरांच्या हाती लागले आहे. त्यावरून तो कराचीस्थित क्लिफ्टन भागात असल्याचे संस्थेने म्हटले आहे़ संभाषणाची ही टेप भारताची गुप्तचर संस्थेकडे देण्यात आली. या वृत्तानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग म्हणाले की, दाऊद मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आहे़ दाऊदला आमच्याकडे सोपवा, ही मागणी भारताने फार पूर्वीच पाकिस्तानकडे केली आहे. (वृत्तसंस्था)