याचिकांच्या सुनावणीची तारीख आज ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 05:01 IST2018-10-23T05:00:48+5:302018-10-23T05:01:00+5:30

शबरीमाला येथील आय्यप्पा मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातल्या महिलांना प्रवेश देण्याच्या ऐतिहासिक निकालाच्या फेरविचारासाठी केलेल्या याचिकांच्या सुनावणीची तारीख सर्वोच्च न्यायालय मंगळवारी निश्चित करणार आहे.

 The date for hearing of petition will be decided today | याचिकांच्या सुनावणीची तारीख आज ठरणार

याचिकांच्या सुनावणीची तारीख आज ठरणार

नवी दिल्ली : शबरीमाला येथील आय्यप्पा मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातल्या महिलांना प्रवेश देण्याच्या ऐतिहासिक निकालाच्या फेरविचारासाठी केलेल्या याचिकांच्या सुनावणीची तारीख सर्वोच्च न्यायालय मंगळवारी निश्चित करणार आहे.
२८ सप्टेंबर रोजी घटनापीठाने दिलेल्या निकालाच्या फेरविचारासाठी दाखल केलेली याचिका तातडीने सुनावणीसाठी घेण्यात यावी, अशी विनंती अ‍ॅड. मॅथ्यूज नेदुम्परा यांनी केली आहे. अशा १९ याचिका न्यायालयात दाखल झाल्या असून त्यांच्या सुनावणीच्या तारखेबाबत सरन्यायाधीश रंजन गोगोई व न्या. एस. के. कौल यांचे खंडपीठ आज निर्णय घेईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरदेखील महिला अद्याप मंदिरात प्रवेश करू शकलेली नाही.

Web Title:  The date for hearing of petition will be decided today