शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Chhattisgarh Assembly Election : दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 09:09 IST

छत्तीसगडमध्ये विधासभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी नक्षलवाद्यांनी हिंसाचार सुरू केला आहे.

ठळक मुद्देछत्तीसगडमध्ये विधासभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी नक्षलवाद्यांनी हिंसाचार सुरू केला आहे. दंतेवाडा येथील कटेकल्याण ब्लॉकमधील तुमाकपल कॅम्प येथे नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. नक्षलवाद्यांनी दोन किलो वजनाचा आयईडी येथे पेरला होता.

रायपूर - छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी नक्षलवाद्यांनी हिंसाचार सुरू केला आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी (12 नोव्हेंबर) सकाळी सुरुवात झाली आहे. राजनांदगावच्या 5 तर बस्तरच्या 3 जागांसाठी आज मतदान होत आहे. दंतेवाडा येथील कटेकल्याण ब्लॉकमधील तुमाकपल कॅम्प येथे नक्षलवाद्यांनी आयईडी (इम्प्रोव्हाईजड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस) स्फोट घडवून आणला. तसेच नक्षलवाद्यांनी दोन किलो वजनाचा आयईडी येथे पेरला होता. मात्र यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. तुमाकपल-नयनार रस्त्यावर हा स्फोट झाला. सुरक्षा दल आणि मतदान अधिकारी सुरक्षित आहेत.

दंतेवाडा येथे शांततेत मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. रविवारी (11 नोव्हेंबर) कांकेर येथे नक्षलवाद्यांनी बीएसएफला लक्ष्य करून सहा बॉम्बस्फोट घडवण्यात आले आहेत. या स्फोटांमध्ये एका जवानाला वीरमरण आले. तसेच बीजापूर येथे सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याला ठार करण्यात आले आहे, तर एकाला अटक करण्यात आली. विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसाचार घडवण्याचे छडयंत्र नक्षलवाद्यांनी आखले असून, गेल्या दहा दिवसांमध्ये सुरक्षा दलांनी नक्षलग्रस्त बस्तर भागातून 300 हून अधिक आयईडी जप्त केले आहेत.

छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात रविवारी सकाळी नक्षलवाद्यांनी बीएसएफच्या गस्तीपथकावर पथकावर आयईडीद्वारे हल्ला केला. यादरम्यान, नक्षलवाद्यांनी सहा स्फोट घडवून आणले. या हल्ल्यात एएसआय महेंद्र सिंह जखमी झाले आहेत. बीएसएफचे गस्तीपथक रविवारी सकाळी कोयलीबेडा परिसरात गस्तीसाठी निघाले होते. त्यावेळी हा हल्ला करण्यात आला. दरम्यान, या जखमी जवानाला वीरमरण आले. दुसरीकडे बीजापूर जिल्ह्यात माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये उडालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका माओवाद्याला कंठस्नान घातले आहे. तर एकाला जिवंत पकडले आहे. या माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडChhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018naxaliteनक्षलवादी