कुंभमेळ्याच्या तोंडावर नाशिकमध्ये डेंग्यूचे संकट !

By Admin | Updated: July 8, 2015 23:45 IST2015-07-08T23:45:14+5:302015-07-08T23:45:14+5:30

Dangue crisis in the heart of Kumbh Mela! | कुंभमेळ्याच्या तोंडावर नाशिकमध्ये डेंग्यूचे संकट !

कुंभमेळ्याच्या तोंडावर नाशिकमध्ये डेंग्यूचे संकट !

>
सात रुग्ण दाखल : महापालिका यंत्रणा झाली सतर्क

नाशिक : कुंभमेळ्याच्या तोंडावर डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढण्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. आठवड्यात विविध रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे सात रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. महापालिकेने सर्वेक्षणास प्रारंभ करतानाच जनजागृतीच्या दृष्टीनेही पावले टाकली आहेत.
गेल्या वर्षी शहरात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले होते. पावसाळा संपल्यानंतरही डिसेंबर-जानेवारीपर्यंत डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. वर्षभरात ही संख्या ४५० वर गेली होती, तर ११०० हून अधिक संशयित रुग्णांवर उपचार करण्यात आले होते.त्यानंतर डेंग्यूचा धोका लक्षात घेता महापौरांनी डिसेंबरमध्यचे विशेष महासभा बोलाविली होती.
आता पुन्हा या आजाराचे संकट उभे ठाकले असून महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे झालेल्या नोंदीनुसार सहा संशयित रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
---------------------
जागा वाटपावरून तंटा
तपोवनामधील साधुग्राममधील प्लॉट वाटपाची जबाबदारी आखाडा प्रमुखांवर सोपवून नामनिराळे राहू पाहात असलेल्या जिल्हा प्रशासनाविरुद्ध साधू-महंतांनी क्रोध प्रकट करत जागा घेण्यास नकार दिला आहे. साधुग्राममध्ये महापालिकेने १९३७ प्लॉट विकसित केले आहे, त्याचे तीन आखाडे व साडेसहाशे खालशांना वाटप केले जात आहे.
--------------------------
पाणी पुरवठा सुरळीत राहणार
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त तपोवनात ३१५ एकर जागेत उभारण्यात आलेल्या साधुग्राममध्ये २४ तास पाणीपुरवठा करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. कुंभकाळात शहरातील दैनंदिन पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार नाही, याचेही नियोजन केले आहे.
------------------

Web Title: Dangue crisis in the heart of Kumbh Mela!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.