देशातील परिस्थिती भयानक झालीय; दलितांच्या सामूहिक धर्मांतरानंतर भाजपा खासदाराचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 15:19 IST2018-04-30T15:19:36+5:302018-04-30T15:19:36+5:30

गुजरातच्या उना येथे जून 2016 मध्ये स्वयंघोषित गोरक्षकांकडून मारहाण करण्यात आलेले दलित तरूण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हिंदू धर्माचा त्याग केला.

Dangerous situation social injustice behind this BJP MP Udit Raj on mass conversion of Dalits in Una | देशातील परिस्थिती भयानक झालीय; दलितांच्या सामूहिक धर्मांतरानंतर भाजपा खासदाराचा इशारा

देशातील परिस्थिती भयानक झालीय; दलितांच्या सामूहिक धर्मांतरानंतर भाजपा खासदाराचा इशारा

अहमदाबाद: उना येथील दलितांच्या सामूहिक धर्मांतराची घटना ही धोकादायक परिस्थितीचे द्योतक असल्याचा इशारा भाजपाचे गुजरातमधील खासदार उदित राज यांनी दिला. त्यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, सामाजिक अन्यायामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. साधी मिशी ठेवली तरी दलितांना मारहाण केली जाते. हे सर्व रोखण्यासाठी नेमके काय करावे, हे मला माहिती नाही. परंतु, ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे, असे उदित राज यांनी म्हटले. 

गुजरातच्या उना येथे जून 2016 मध्ये स्वयंघोषित गोरक्षकांकडून मारहाण करण्यात आलेले दलित तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हिंदू धर्माचा त्याग केला. उना नजीकच्या मोटा समढियाला या गावात त्यांनी रविवारी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. या सोहळ्यात भिक्खुंकरवी 400 दलितांना बौद्ध धर्माची शपथ देण्यात आली. गुजरातमधील धार्मिक स्वातंत्र्याच्या कायद्यातंर्गत आता जिल्हाधिकाऱ्यांकडे याची नोंदणी करण्यात येईल. त्यानंतर या दलित कुटुंबीयांच्या धर्मांतराला अधिकृत मान्यता मिळेल. 

गेल्यावर्षी मोटा समढियाला या गावात मृत गायीच्या शरीरावरील चामडे काढत असताना स्वयंघोषित गोरक्षकांच्या टोळक्याने वश्राम, रमेश, अशोक आणि बेचर यांना मारहाण करण्यात आली होती. गोरक्षकांच्या टोळक्याने त्यांची धिंड काढली होती, तसेच त्यांना एका कारला बांधून मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. यावरून केंद्रातील मोदी सरकारला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर काल या तरूणांनी अन्य काही दलित बांधवांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला.  

Web Title: Dangerous situation social injustice behind this BJP MP Udit Raj on mass conversion of Dalits in Una

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.