शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीच्या पूर्व भागात नुकसान

By admin | Updated: March 3, 2016 01:57 IST

सर्वतीर्थ टाकेद ( वार्ताहर ) ईगतपुरी तालुक्यातील पुर्व भागात सांयकाळी सहा वाजता तुफान वादळी वा-यासह गारांचा पाऊस पडुन सर्वत्र आहाकार उडाला.या पाऊस व गारापिटी मुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चार वाजे पासुनच विजांचा गडगडाट सुरू झाला होता.कुठेतरी ढग दिसत होते मात्र विजांचा कडकडाट सुरू झाला व आंबेवाडी खडकेद ...


सर्वतीर्थ टाकेद ( वार्ताहर ) ईगतपुरी तालुक्यातील पुर्व भागात सांयकाळी सहा वाजता तुफान वादळी वा-यासह गारांचा पाऊस पडुन सर्वत्र आहाकार उडाला.या पाऊस व गारापिटी मुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चार वाजे पासुनच विजांचा गडगडाट सुरू झाला होता.कुठेतरी ढग दिसत होते मात्र विजांचा कडकडाट सुरू झाला व आंबेवाडी खडकेद इंदोरे वासाळी खेड माळवाडी या भागाकडून प्रथम सोसाट्याचा वारा व पाऊस सुरू झाला अन् क्षणात सोनोशी बांबळेवाडी मायदरा टाकेद अधरवड अडसरे या भागात गारांचा वर्षाव होऊन सर्वत्र गारांचाच पाऊस सुरू झाला.शेतात अंगणात रस्त्यात गारांचे ढीग साचले होते.सर्वत्र पांढरेशुभ्र आच्छादन तयार झाले होते.
खेड माळवाडी काननवाडी या भागात मलाचिन पेपर गारपीटीमुळे फाटून गेला.तर पिकांची अवस्था तर वर्णन करण्यापलीकडे आहे.शेतक-यांनी कर्ज काढुन एक एकरासाठी ड्रीप व मलाचिनपेपर साठी लाख रूपये खर्च केले आहेत.या भागात सुमारे चारशे हेक्टर क्षेत्राची नुकसान झाल्याचा अंदाज वर्तिवला जात आहे.टॉमँटो वांगी काकडी कांदा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या बाबत तहसिलदार महेंद्र पवार यांनी प्रत्येक्ष पहाणी करून शेतक-यांच्या व्यथा जाणल्या.
या गारपीटी मुळे कांदा हा पुर्ण पसरून गेला व त्यावर गारांचा थर साचल्यामुळे या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.अनेक शेतक-यांनी कांदे काढण्यास सुरवात केली होती तर काही शेतकरी कांदे काढण्याच्या तयारीत होते या मुळे हातातोंडाशी आलेला घास या गारपीठीमुळे नष्ट झाल्याने शेतकरी हवाल दिल झाला आहे.
अनेक शेतक-यांनी हरभरा काढण्यास सुरवात केली होती ज्यांनी काढला तो शेतातच राहीला तर ज्यांनी काढला नाही तो फुगुन जाईल तर अनेक शेतक-यांचे टॉम्याटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सोंगणीस आलेला गहू आडवा पडला तर ज्यांनी कापणी करून शेतात ठेवला होता त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अडसरे फळविहीर वाडी येथे सुदाम कातोरे यांच्या कलींगडाचे शेतात पुर्ण पाणी साचुन सर्व पिकच नष्ट झाले आहे.
झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतक-यांना शासनाने विजिबल माफ कराव.बँकेची वसुली थांबवावी .शेतक-यांना दुबार पेरणी साठी त्वरीत मदत देण्याची मागणी शेकापचे नाशिक जिल्हा सरचिटणसि अशोक बोराडे .उपसभापती पांडुरंग पाटील वारूंगसे .हरीभाऊ वाजे बाळासाहेब घोरपडे रामचंद्र परदेशी यांनी मागणी केली आहे.
वार्ताहर