दलित युवकाचा खून शिर्डीजवळील घटना : आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना
By Admin | Updated: May 18, 2015 01:16 IST2015-05-18T01:16:19+5:302015-05-18T01:16:19+5:30
शिर्डी : नगर-मनमाड रोडवरील शिंगवे रुई परिसरात सागर सुभाष शेजवळ (वय २०, रा. शिर्डी) या दलित युवकाचा दगड आणि अंगावर वाहन घालून निघृर्ण खून करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली. या घटनेने शिर्डी शहरात एकच खळबळ उडाली आहे. मयताच्या नातेवाईकांनी व्यक्त केलेल्या संशयावरून आरोपींच्या शोधासाठी विशेष पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

दलित युवकाचा खून शिर्डीजवळील घटना : आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना
श र्डी : नगर-मनमाड रोडवरील शिंगवे रुई परिसरात सागर सुभाष शेजवळ (वय २०, रा. शिर्डी) या दलित युवकाचा दगड आणि अंगावर वाहन घालून निघृर्ण खून करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली. या घटनेने शिर्डी शहरात एकच खळबळ उडाली आहे. मयताच्या नातेवाईकांनी व्यक्त केलेल्या संशयावरून आरोपींच्या शोधासाठी विशेष पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.राहता आणि शिर्डीच्या मध्यभागी असलेल्या नगर-मनमाड रोडवरील बी. एम. शॉपी या दुकानासमोर मयत सागर आणि विशाल अशोक कोते, रुपेश वाडेकर (रा. शिर्डी ) यांच्यासह अन्य सहा-सात जणांचे वाद झाले. त्यापूर्वी सागर याला सहा-सात जणांनी एका वाहनातून उचलून आणले. याच दुकानासमोर या जमावाने सागर याला मारहाण केली. त्यानंतर त्याला शिंगवे रुई शिवारात नेण्यात आले. तेथेही बेदम मारहाण करून दगडाने ठेचले. अंगावर रिक्षासारखे वाहन घालून अमानुषपणे खून करण्यात आल्याची तक्रार मयताच्या नातेवाईकांनी शिर्डी पोलीस ठाण्यात केली आहे. दरम्यान, घटना घडली ते ठिकाण राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मयताच्या नातेवाईकांनी रात्री शिर्डी पोलीस ठाण्याला वेढा घातला होता. आरोपींना अटक केल्याशिवाय सागर याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा नातेवाईंकांनी दिला आहे. दरम्यान, पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील रात्रीच शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यांनी आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. सागर याचा खून कशासाठी झाला, याचे कारण रात्री उशिरापर्यंत उलगडले नाही. दरम्यान बी.एम. शॉपीच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात सागरला मारहाण करतानाचे फुटेज पोलिसांना मिळाले असून त्यावरूनच पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.सागर शेजवळ याला विशाल कोते व रुपेश वाडेकर यांच्यासह सात जणांनी शिंगवे रुई शिवारात नेले. तेथे त्याच्या अंगावर दगड फेकून तसेच रिक्षा घालून त्याला ठार मारले, असा आरोप मयताचे नातेवाईक उमेश शेजवळ यांनी पोलिसांकडे केला आहे. (तालुका प्रतिनिधी)