दलित कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी
By Admin | Updated: May 9, 2014 21:13 IST2014-05-09T21:13:28+5:302014-05-09T21:13:28+5:30
कोल्हापूर : राज्यभरात दलित समाजातील कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी आलेल्या दलित कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज हुल्लडबाजी केली. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना तसेच वृत्तपत्रांच्या प्रतिनिधी व छायाचित्रकारांना बसला. जिल्हाधिकार्यांनी रस्त्यावर येऊन आमचे निवेदन स्वीकारावे, असा आग्रहही त्यांनी धरला. जिल्हाधिकारी पुढे न गेल्याने त्यांचा निषेध करत मुख्य दरवाजावरच बांगड्या व निवेदन चिकटविण्यात आले.

दलित कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी
क ल्हापूर : राज्यभरात दलित समाजातील कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी आलेल्या दलित कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज हुल्लडबाजी केली. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना तसेच वृत्तपत्रांच्या प्रतिनिधी व छायाचित्रकारांना बसला. जिल्हाधिकार्यांनी रस्त्यावर येऊन आमचे निवेदन स्वीकारावे, असा आग्रहही त्यांनी धरला. जिल्हाधिकारी पुढे न गेल्याने त्यांचा निषेध करत मुख्य दरवाजावरच बांगड्या व निवेदन चिकटविण्यात आले.जिल्ातील दलित समाजातील विविध संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानुसार दुपारी सुमारे दोनशेहून अधिक कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते. निदर्शने केल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी मुख्य दरवाजावर यावे, असा कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. मात्र, त्यावेळी जिल्हाधिकारी बैठकीत व्यस्त असल्याने त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी संजय शिंदे यांना निवेदन स्वीकारण्यास सांगितले. प्रथेप्रमाणे शिष्टमंडळाने आत यावे, असा निरोप पाठविण्यात आला मात्र तो त्यांना मान्य केला नाही.जिल्हाधिकार्यांनी बाहेर यावे, असा आग्रह कार्यकर्त्यांनी कायम ठेवला. त्याचवेळी कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी सुरू केली. रस्ता बंद करून येणा-जाणार्या नागरिकांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना तसेच छायाचित्रकारांना शिवीगाळ केली. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनीही बाहेर येऊन निवेदन स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे अधिकच संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. मुख्य दरवाज्यावर बांगड्या व निवेदन चिकटले आणि सर्व कार्यकर्ते निघून गेले.