उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात दलित महिलेवर पुन्हा सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 06:51 IST2020-10-05T03:45:54+5:302020-10-05T06:51:22+5:30

पोलिसांनी सांगितले की, या महिलेच्या पतीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करुन दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Dalit woman gang raped again in Uttar Pradeshs Bhadohi district | उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात दलित महिलेवर पुन्हा सामूहिक बलात्कार

उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात दलित महिलेवर पुन्हा सामूहिक बलात्कार

भदोही : उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणावरुन देशात संतापाची लाट उसळलेली असतानाच उत्तर प्रदेशातीलच भदोही जिल्ह्यात ज्ञानपूर भागात एका ४४ वर्षीय दलित विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना रविवारी समोर आली. पोलिसांनी सांगितले की या महिलेच्या पतीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करुन दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक राम बदन सिंह यांनी सांगितले की, या महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, ही दलित महिला शनिवारी बँकेतून पैसे घेऊन घरी जात होती. रस्त्यात धनंजय शुक्ला, अजय शुक्ला यांनी तिला सांगितले की, आम्ही तुला घरी सोडतो. मात्र, त्यांनी तिला रायपूर गावातील एका बागेत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. धनंजय शुक्ला, अजय शुक्ला, सोनू उपाध्याय आणि विकास शुक्ला या चार जणांनी अत्याचार केल्याचा आरोप महिलेच्या पतीने तक्रारीत केला आहे.

Web Title: Dalit woman gang raped again in Uttar Pradeshs Bhadohi district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.