भाजपाशासित राज्यांमध्ये दलित, अल्पसंख्य भयभीत; राहुल गांधींचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:30 IST2018-07-30T00:30:33+5:302018-07-30T00:30:45+5:30

भाजपाशासित राज्यांमध्ये झुंडशाही आणि उन्मादी जमावांकडून हत्येच्या घटना वाढत आहेत व त्यामुळे दलित व अल्पसंख्य समाज भयभीत झाले आहेत, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.

Dalit, minority fear in BJP-ruled states; Rahul Gandhi's accusation | भाजपाशासित राज्यांमध्ये दलित, अल्पसंख्य भयभीत; राहुल गांधींचा आरोप

भाजपाशासित राज्यांमध्ये दलित, अल्पसंख्य भयभीत; राहुल गांधींचा आरोप

नवी दिल्ली: भाजपाशासित राज्यांमध्ये झुंडशाही आणि उन्मादी जमावांकडून हत्येच्या घटना वाढत आहेत व त्यामुळे दलित व अल्पसंख्य समाज भयभीत झाले आहेत, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.
काँग्रेस पक्षाच्या अनुसुचित जाती सेलला दोन दिवसांपूर्वी लिहिलेल्या पत्रात हा आरोप करून राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, या अविचारी हिंसाचाराने पीडित होणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहून काँग्रेसने त्यांचे जाहीरपणे समर्थन करणे महत्वाचे आहे.
काँग्रेस अध्यक्षांनी म्हटले की, या राज्यांमधील सत्ताधाºयांनी या घटनांकडे केवळ दुर्लक्षच केले नाही तर त्या आणखी वाढून भीतीचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी खतपाणी घातले. ठराविक समाजाच्या लोकांना लक्ष्य करण्यासाठी आपल्या समर्थकांना चिथावणाºया भाजपाच्या मंत्र्यांनी व नेत्यांनी केलेल्या भाषणांमुळे स्थानिक गुंड मोकाट सुटले आहेत.

Web Title: Dalit, minority fear in BJP-ruled states; Rahul Gandhi's accusation