दै.पान.२...चोरीप्रकरणी स्वयंपाकिणीसह सराफ व्यापार्‍यास अटक चोरलेले दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त; संशयितांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

By Admin | Updated: May 9, 2014 22:48 IST2014-05-09T22:48:15+5:302014-05-09T22:48:15+5:30

कोल्हापूर : राजारामपुरी सहाव्या गल्लीतील एका शिक्षिकेच्या घरामध्ये स्वयंपाक करणार्‍या महिलेसह सराफ व्यापार्‍यास राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित मनिषा विनायक कालेकर (वय ३३, रा. शाहू कॉलनी, कागल) व चोरीचे सोन्याचे दागिने विकत घेणार्‍या गुजरीतील सराफ व्यापारी प्रथमेश ज्ञानेश्वर भस्मे (वय ३०, रा. नागाळा पार्क कमानीजवळ, शिवरत्न बंगला) असे अटक केलेल्यांची नावे असून सोमवार (दि. १२)पर्यंत न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी दिली आहे.

Daily Bhaskar: With goldfinch, gold trader seized 10 gold coins stolen for stealing; The suspects are Monday's police custody | दै.पान.२...चोरीप्रकरणी स्वयंपाकिणीसह सराफ व्यापार्‍यास अटक चोरलेले दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त; संशयितांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

दै.पान.२...चोरीप्रकरणी स्वयंपाकिणीसह सराफ व्यापार्‍यास अटक चोरलेले दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त; संशयितांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

ल्हापूर : राजारामपुरी सहाव्या गल्लीतील एका शिक्षिकेच्या घरामध्ये स्वयंपाक करणार्‍या महिलेसह सराफ व्यापार्‍यास राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. संशयित मनिषा विनायक कालेकर (वय ३३, रा. शाहू कॉलनी, कागल) व चोरीचे सोन्याचे दागिने विकत घेणार्‍या गुजरीतील सराफ व्यापारी प्रथमेश ज्ञानेश्वर भस्मे (वय ३०, रा. नागाळा पार्क कमानीजवळ, शिवरत्न बंगला) असे अटक केलेल्यांची नावे असून सोमवार (दि. १२)पर्यंत न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, राजारामपुरी सहाव्या गल्लीतील गौरी अमरदीप चौगले या शिक्षिका आहेत. चौगले यांच्या बंद घराचे कुलूप बनावट चावीने उघडून २६ एप्रिल २०१४ रोजी घरातील पाच तोळे वजनाच्या दोन पाटल्या आणि पाच बांगड्या प्रत्येकी सव्वा तोळे असे सुमारे दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. याबाबतची फिर्याद गौरी चौगले यांनी काल (गुरुवार) पोलिसात दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता संशयित मनिषा कालेकर यांचे नाव प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. कालेेकर हिने दागिने सराफ व्यापारी प्रथमेश भस्मे यांना दिल्याचे पोलिसांना सांगितले. तपास पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव करीत आहेत.
===================================

Web Title: Daily Bhaskar: With goldfinch, gold trader seized 10 gold coins stolen for stealing; The suspects are Monday's police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.