दै.पान.२...महिपतराव बोंद्रेसह नातवाला अद्याप अटक नाही सीसीटीव्ही फूटेज असूनही इतर संशयितांची नावे निष्पन्न नाही
By Admin | Updated: May 9, 2014 22:48 IST2014-05-09T22:48:13+5:302014-05-09T22:48:13+5:30
कोल्हापूर : परदेशी फुटबॉल खेळाडूला बेदम मारहाण केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले महिपतराव शंकरराव बोंद्रे व त्यांचा नातू शिवतेज खराडे या दोघांचा शोध शुक्रवारी (दि. ९)सुरू होता. पोलिसांनी शिवाजी पेठेतील त्यांच्या राहत्या घरी झडती घेतली असता मात्र ते मिळाले नाहीत.

दै.पान.२...महिपतराव बोंद्रेसह नातवाला अद्याप अटक नाही सीसीटीव्ही फूटेज असूनही इतर संशयितांची नावे निष्पन्न नाही
क ल्हापूर : परदेशी फुटबॉल खेळाडूला बेदम मारहाण केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले महिपतराव शंकरराव बोंद्रे व त्यांचा नातू शिवतेज खराडे या दोघांचा शोध शुक्रवारी (दि. ९)सुरू होता. पोलिसांनी शिवाजी पेठेतील त्यांच्या राहत्या घरी झडती घेतली असता मात्र ते मिळाले नाहीत.दरम्यान, शाहू स्टेडियमवर झालेल्या फुटबॉल सामन्यावेळी झालेल्या मारहाणीचे चित्रीकरण सीसीटीव्ही फुटेजमध्ये झाले आहे तरीही, बोंद्रे यांच्या अन्य साथीदारांची नावे अद्याप निष्पन्न झालेली नाहीत.याबाबत पोलिसांनी सांगितले की, मंगळवार पेठेतील शाहू स्टेडियमवर बुधवारी (दि. ७) रात्री फुटबॉल सामना सुरू होता. त्यावेळी व्हिक्टर जॅक्सन या फुटबॉल खेळाडूला संशयित महिपतराव बोंद्रे (पापा) व त्यांचा नातू शिवतेज खराडेसह अन्य साथीदारांनी बेदम मारहाण केली. या मारहाणप्रकरणी एस. एम. भोसले यांनी संशयितांविरोधात फिर्याद दिली. काल (गुरुवारी) व शुक्रवारी पोलिसांनी या दोघांचा शोध सुरू केला पण ते रात्री उशिरापर्यंत सापडले नाहीत.पोलिसांनी मैदानात झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या चित्रीकरणाची सीडी मिळवली आहे. या फुटेजवरून संशयितांचा शोध सुरू असून उद्या(शनिवार)पर्यंत त्यांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.====================