३०० वर्षापूर्वीचे पुरातन काळातील डागोबाचे स्वयंभु मंदिर
By Admin | Updated: February 15, 2016 00:37 IST2016-02-15T00:37:52+5:302016-02-15T00:37:52+5:30
बाराज्योतिर्लिंगापैकी एक असणार्या श्री क्षेत्र भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाकडे जाताना अलीकडे १५ कि.मी. अंतरावर एका उंच ्शा डोंगरावर चिखली (ता. आंबेगाव) या गाावामध्ये स्वयंभु डागोबा देवाचे मंदीर निसर्गरम्य ठिकाणी वसले आहे. डागोबा देवाची एक पौराणिक कथा आहे. या देवाचे मंदीर पूर्वी राजापूर (आताचे राजपुर) डागेवाडी वस्तीच्या् दक्षिणेस उंच डोंगर माथ्यावर कालभैरवनाथ या नावाने मंदीर होते. या मंदिराचे दगड १० फुट मापाचे आडवे तिडवे होते.त्या काळी पुणे मंचर भीमाशंकर रस्ता नव्हता केवळ होती ती फक्त पाऊल वाट श्री क्षेत्र भीमाशंकराला येणारे भाविक या पाऊल वाटने येत जात असत. या परिसरामध्ये किर्रर्र घनदाट जंगल होते. त्यावेळी या परिसरामधून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करुन कोळशाच्या भट्या लावल्या जात व मोठ्या प्रमाणात कोळशाचा वापर केला जाई. यावेळी कोळशा

३०० वर्षापूर्वीचे पुरातन काळातील डागोबाचे स्वयंभु मंदिर
ब राज्योतिर्लिंगापैकी एक असणार्या श्री क्षेत्र भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाकडे जाताना अलीकडे १५ कि.मी. अंतरावर एका उंच ्शा डोंगरावर चिखली (ता. आंबेगाव) या गाावामध्ये स्वयंभु डागोबा देवाचे मंदीर निसर्गरम्य ठिकाणी वसले आहे. डागोबा देवाची एक पौराणिक कथा आहे. या देवाचे मंदीर पूर्वी राजापूर (आताचे राजपुर) डागेवाडी वस्तीच्या् दक्षिणेस उंच डोंगर माथ्यावर कालभैरवनाथ या नावाने मंदीर होते. या मंदिराचे दगड १० फुट मापाचे आडवे तिडवे होते.त्या काळी पुणे मंचर भीमाशंकर रस्ता नव्हता केवळ होती ती फक्त पाऊल वाट श्री क्षेत्र भीमाशंकराला येणारे भाविक या पाऊल वाटने येत जात असत. या परिसरामध्ये किर्रर्र घनदाट जंगल होते. त्यावेळी या परिसरामधून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करुन कोळशाच्या भट्या लावल्या जात व मोठ्या प्रमाणात कोळशाचा वापर केला जाई. यावेळी कोळशाचा व्यापर करणार्या व्यापार्याचे १२ बैल हरवले होते.तो व्यापारी भीमाशंकर परिसरात मध्ये आपले हरवलेले बेल शोधु लागला. शोधत असताना त्याला एक मंदेवाचे मंदीर दिसले. ते मंदीर होते. काळभैरवाथाचे त्याने व देवाला नवस केला की माझे बैल सापडू दे मी एक बैल देईल असा नवस करुन बैल शोधु लागला. नवसाप्र्माणे १२ बैल सापडले ा व्यापार्याने नवस फेडण्यासाठी बैल जाणा न सोडता एक बेल काळभैरवनाथा समोर कापला. त्या बैलाचा बळी रक्तपात होत असता एकदम अचानक मोठा स्फोट झाला. हे दगड गोटे १ कि.मी. अंतराव फेकले गेले. काळभैरवनाथ राजापुर या गावावरुन निघुन तळेघर येथील डोंगरावर असणार्या वरसुबाई मातेच्या आपल्या बहीणीच्या शेजारून जात असताना वरसुबाईने भावास शपथ दिली. लांब जाऊ नकोस मला दिसेल अशाा ठिकाणी थांब त्यावेळेस श्री काळभैरवनाथ चिखली गावच्या दक्षिणेस उंच डोंगरावर स्वयंभु निघाले. या देवाचे पुजारी भोमाळे यांच्या स्वप्नात येवून सांगितले की यापुढे डागोबा नावाने माझा प्रचार कर तेव्हापासून यास डागोबा असे नाव देण्यात आले आहे.त्यानंतर पुढील काळात ब्रिटीश इंग्रज सरकारच्या सुरू झाला. असता तेथे सर्वेक्षण सुरु झाले. उंच सखल नैसर्गिक संरक्षणाच्या दृष्टीने हे ठिकाण योग्य असल्यामुळे त्याच प्र्माणे जगाचा संपर्क जोडला जावा म्हणून इंग्रज सरकारने सन १९३० ते ॉ१९४० साली १० ते १५ बंगले बांधण्यात आले होत. त्याचीसाक्ष म्हणून या डोंगरावर याच बंगल्याचे पाया मूर्तीमंत उदाहरणे आहे. सन १९४० ते ५० मध्ये हे बंगले उद्दावरुन झाले. त्यांच्या संशोधनावरुन केंद्र सरकारने सन १९७० नंतर या डोंगरावर रडार केंद्र उभारण्यात आलेले आहे. त्यामुळे डागोबा देवस्थान अत्यंत महत्वाच्या ठिकाणी वसले आहे. उंच सखल डोंगर माथ्या मध्यभागी असल्यामुळे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखी आहे. ब्रिटीश कालीन टाके ही या ठिकाणी पहावयास मिळतात.- संतोष जाधव - पाटील, तळेघर