शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

देवभूमीमध्येच का कोसळत आहेत सर्वाधिक हिमकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 07:38 IST

२०२१ सालापासूनच्या घटनांचा आढावा घेतला तर त्यातील सर्वाधिक घटना उत्तराखंड राज्यात झाल्याचे दिसते.

नवी दिल्ली : देशात हिमकडा कोसळण्याच्या २०२१ सालापासूनच्या घटनांचा आढावा घेतला तर त्यातील सर्वाधिक घटना उत्तराखंड राज्यात झाल्याचे दिसते. त्याशिवाय जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीममध्येही अशा प्रकारच्या घटना झाल्या होत्या. त्यामध्ये लष्कराचे जवान, विदेशी नागरिक, स्थानिक लोक मरण पावले होते.

याआधी झालेल्या हिमकडा कोसळण्याच्या भीषण दुर्घटना

७ फेब्रुवारी २०२१ : उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून ८० जणांचा मृत्यू, तर २००पेक्षा अधिकजण बेपत्ता झाले.  ऋषिगंगा जलविद्युत प्रकल्पाचे नुकसान.२३ एप्रिल २०२१ : उत्तराखंडमध्ये भारत-चीन सीमेच्या जवळ एका हिमकडा कोसळून आठजणांचा मृत्यू झाला. ३८० लोकांची सुखरूप सुटका केली.६ फेब्रुवारी २०२२ : अरुणाचल प्रदेशात चीनलगतच्या सीमाभागात कामेंग येथे १४ हजार फुटांवर हिमकडा कोसळून सात भारतीय जवान शहीद झाले.४ ऑक्टोबर २०२२ : उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून १६ लोकांचा मृत्यू. त्यामध्ये गिर्यारोहकांचा समावेश होता.१ फेब्रुवारी २०२३ : जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे हिमकडा स्की रिसॉर्ट परिसरात कोसळून पोलंडच्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला व २१ लोकांना वाचविण्यात आले.४ एप्रिल २०२३ : सिक्कीममध्ये हिमकडा कोसळून सातजणांचा मृत्यू.२२ फेब्रुवारी २०२४ : जम्मू- काश्मीरमधील गुलमर्ग येथे हिमकडा कोसळून त्याखाली सहा रशियन स्कीयर्स आणि त्यांचा स्थानिक मार्गदर्शक अडकले होते. त्यातील एका रशियन नागरिकाचा मृत्यू झाला. इतरांची सुटका करण्यात आली.२ मार्च २०२४ मार्च : हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅलीत हिमकडा कोसळून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ८१ जणांना वाचविण्यात आले.२८ फेब्रुवारी २०२५ : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात माणा गावाजवळ हिमकडा कोसळला. ५७ कामगार दबले होते. त्यांतील १६ जणांची सुटका करण्यात आली, तर ४१ जणांचा जीव वाचविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते.