देवभूमीमध्येच का कोसळत आहेत सर्वाधिक हिमकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 07:38 IST2025-03-01T07:38:10+5:302025-03-01T07:38:19+5:30

२०२१ सालापासूनच्या घटनांचा आढावा घेतला तर त्यातील सर्वाधिक घटना उत्तराखंड राज्यात झाल्याचे दिसते.

daevabhauumaimadhayaeca-kaa-kaosalata-ahaeta-saravaadhaika-haimakadae | देवभूमीमध्येच का कोसळत आहेत सर्वाधिक हिमकडे?

देवभूमीमध्येच का कोसळत आहेत सर्वाधिक हिमकडे?

नवी दिल्ली : देशात हिमकडा कोसळण्याच्या २०२१ सालापासूनच्या घटनांचा आढावा घेतला तर त्यातील सर्वाधिक घटना उत्तराखंड राज्यात झाल्याचे दिसते. त्याशिवाय जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश, सिक्कीममध्येही अशा प्रकारच्या घटना झाल्या होत्या. त्यामध्ये लष्कराचे जवान, विदेशी नागरिक, स्थानिक लोक मरण पावले होते.

याआधी झालेल्या हिमकडा कोसळण्याच्या भीषण दुर्घटना

७ फेब्रुवारी २०२१ : उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून ८० जणांचा मृत्यू, तर २००पेक्षा अधिकजण बेपत्ता झाले.  ऋषिगंगा जलविद्युत प्रकल्पाचे नुकसान.
२३ एप्रिल २०२१ : उत्तराखंडमध्ये भारत-चीन सीमेच्या जवळ एका हिमकडा कोसळून आठजणांचा मृत्यू झाला. ३८० लोकांची सुखरूप सुटका केली.
६ फेब्रुवारी २०२२ : अरुणाचल प्रदेशात चीनलगतच्या सीमाभागात कामेंग येथे १४ हजार फुटांवर हिमकडा कोसळून सात भारतीय जवान शहीद झाले.
४ ऑक्टोबर २०२२ : उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून १६ लोकांचा मृत्यू. त्यामध्ये गिर्यारोहकांचा समावेश होता.
१ फेब्रुवारी २०२३ : जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे हिमकडा स्की रिसॉर्ट परिसरात कोसळून पोलंडच्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला व २१ लोकांना वाचविण्यात आले.
४ एप्रिल २०२३ : सिक्कीममध्ये हिमकडा कोसळून सातजणांचा मृत्यू.
२२ फेब्रुवारी २०२४ : जम्मू- काश्मीरमधील गुलमर्ग येथे हिमकडा कोसळून त्याखाली सहा रशियन स्कीयर्स आणि त्यांचा स्थानिक मार्गदर्शक अडकले होते. त्यातील एका रशियन नागरिकाचा मृत्यू झाला. इतरांची सुटका करण्यात आली.
२ मार्च २०२४ मार्च : हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅलीत हिमकडा कोसळून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ८१ जणांना वाचविण्यात आले.
२८ फेब्रुवारी २०२५ : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात माणा गावाजवळ हिमकडा कोसळला. ५७ कामगार दबले होते. त्यांतील १६ जणांची सुटका करण्यात आली, तर ४१ जणांचा जीव वाचविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते.
 

Web Title: daevabhauumaimadhayaeca-kaa-kaosalata-ahaeta-saravaadhaika-haimakadae

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.