दिल्लीत कारचालकाची दबंगगिरी,१३ जणांना चिरडले

By Admin | Updated: August 18, 2014 20:30 IST2014-08-18T20:30:59+5:302014-08-18T20:30:59+5:30

एका ३० वर्षाच्या युवकाने रस्त्यावर झोपलेल्या १३ मजुरांना चिरडले असून त्यातील एका युवकाचा मृत्यू झाला आहे

Dabangagiri, the driver of the car crashed in Delhi, 13 people | दिल्लीत कारचालकाची दबंगगिरी,१३ जणांना चिरडले

दिल्लीत कारचालकाची दबंगगिरी,१३ जणांना चिरडले

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली,दि. १८ - एका ३० वर्षाच्या युवकाने रस्त्यावर झोपलेल्या १३ मजुरांना चिरडले असून त्यातील एका युवकाचा मृत्यू झाला आहे. तर, इतर १२ जण जखमी झाले आहेत. ऋषीकुमार वय ३० वर्ष हा मद्यधूंद अवस्थेत गाडी चालवत होता. निगामबोध येथे रात्री १०:१५ च्या सुमारास गाडीचावेग सावरता न आल्याने गाडी फुटपाथवर जाऊन येथे झोपलेल्या १३ निष्पाप मजुर चिरडले गेले. ऋषीकुमार हा व्यावसायाने इस्टेट एजंट असून जाहांगिरपुरी येथील विनोद नगरचा रहिवासी आहे. तसेच अपघाताच्या वेळी त्याच्यासोबत त्याची मेहूणी गाडीत असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. या अपघातात इकराज या २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून इतर १२ जणांवर अरुणा असफली, सुश्रुषा व बारा हिंदूराव हॉस्पिटल येथे उपचार करून सोडण्यात आले आहे.

Web Title: Dabangagiri, the driver of the car crashed in Delhi, 13 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.