शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

...अन् वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा! सिलिंडरचा स्फोट; नवऱ्याची आई, काकी, वहिनी, 2 बहिणींचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 10:30 IST

लग्नघरात पाच महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर कुटुंबासह संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

राजस्थानसारखाच एक प्रकार मध्य प्रदेशातील भिंडमध्येही घडला आहे. लग्नाच्या विधीदरम्यान घरात ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला, उपचारादरम्यान नवरदेवाची आई, काकी, वहिनी आणि दोन बहिणींचा मृत्यू झाला. काही महिन्यांपूर्वी राजस्थानच्या जोधपूरमध्येही अशीच एक घटना घडली होती, जिथे लग्नाची वरात निघण्यापूर्वी घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन 35 जणांचा मृत्यू झाला होता.

मध्यप्रदेशातील लग्नघरात पाच महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर कुटुंबासह संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. घरामध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. पण या घटनेने हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिंड जिल्ह्यातील गोरमी भागातील कचनाव कला गावात राहणाऱ्या रिंकू यादवची लग्नाची वरात 22 फेब्रुवारीला जाणार होती. 

20 फेब्रुवारी रोजी लग्नाचे विधी पार पडले. रिंकूच्या घरी कुटुंबाव्यतिरिक्त नातेवाईक आणि गावातील लोक उपस्थित होते. लोकांसाठी जेवण तयार केले जात होते. याच दरम्यान गॅस सिलिंडरचा वापर स्वयंपाकासाठी केला जात होता. अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेत रिंकू यादवची आई जलदेवी, वहिनी नीरू, काकी पिंकी, दोन विवाहित बहिणी अनिता आणि सुनीता यांच्यासह 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.

उपचारासाठी सर्वांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने 8 जणांना ग्वाल्हेरला रेफर करण्यात आले. मात्र, रिंकू यादवची आई, वहिनी, पिंकी आणि दोन्ही बहिणींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना दिल्ली एम्समध्ये पाठवण्यात आले. त्यामुळे पाचही महिलांवर एम्समध्ये उपचार सुरू होते. पण पाचही महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारी सकाळी सर्वांचे मृतदेह गावात आणण्यात आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :fireआगCylinderगॅस सिलेंडरmarriageलग्न