जेवण बनवताना सिलेंडरचा स्फोट, दोन घरे उद्ध्वस्त, आठ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 08:28 AM2021-06-02T08:28:27+5:302021-06-02T08:29:15+5:30

Gonda Cylinder Blast: घरात जेवण बनवत असताना गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या भीषण दुर्घटनेत दोन घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. तसेच या दुर्घटनेत दोन्ही घरातील १५ जण ढिगाऱ्याखाली दबले जाऊन आठ जणांचा मृत्यू झाला.

A cylinder Blast while cooking in Gonda, destroying two houses and killing eight people | जेवण बनवताना सिलेंडरचा स्फोट, दोन घरे उद्ध्वस्त, आठ जणांचा मृत्यू 

जेवण बनवताना सिलेंडरचा स्फोट, दोन घरे उद्ध्वस्त, आठ जणांचा मृत्यू 

Next

गोंडा (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्यात एका घरात जेवण बनवत असताना गॅस सिलेंडरचास्फोट होऊन झालेल्या भीषण दुर्घटनेत दोन घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. (Gonda Cylinder Blast) तसेच या दुर्घटनेत दोन्ही घरातील १५ जण ढिगाऱ्याखाली दबले जाऊन आठ जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना गोंडा जिल्ह्यातील वजीरगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील टिकरी गावात घडली. दुर्घटनेज जखमी झालेल्या सात जणांना उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर ढिगाऱ्याखाली एक लहान मुलगा दबलेला असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (A cylinder Blast while cooking in Gonda, destroying two houses and killing eight people)

या दुर्घटनेत जमीनदोस्त झालेल्या घरांच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत दोन महिला, दोन पुरुष आणि चार मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर ढिगाऱ्याखाली सापडलेल्या सात जणांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. टिकरी गावातील नुरुल हसन यांच्या घरात गॅस सिलेंडरचास्फोट होऊन ही दुर्घटना घडली. या स्फोटात शेजारी फकिरे यांचेही घर कोसळले. 



स्फोटाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आजूबाजूच्या पोलीस ठाण्यामधील फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले. त्यानंतर ढिगाऱ्याखालून आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, स्फोटामागचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. मात्र स्फोटाची तीव्रता पाहता काहीही अंदाज लावणे कठीण आहे. तपासणी करण्यासाठी फॉरेंसिक टीम घटनास्थळावर दाखल झाली आहे.  

एसपी संतोष मिश्रा यांनी सांगितले की, जेवण बनवताना स्फोट होऊन घर कोसळल्याची माहिती आम्हाला ११२ कॉलवरून समजली. त्यानंतर पोलीस आणि आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. आठ जणांचा मृत्यू झाला असून, सात जण जखमी आहेत. 

Read in English

Web Title: A cylinder Blast while cooking in Gonda, destroying two houses and killing eight people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.