शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
2
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
3
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
5
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
6
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
7
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
8
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
9
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
10
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
11
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
12
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
14
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
15
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
16
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
17
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
18
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
19
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
20
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका

Cyclone Fani : 'फनी' चक्रीवादळ धडकणार; आंध्र-प्रदेश, केरळ, ओडिशा, तामिळनाडूत सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 11:40 IST

आंध्र-प्रदेश, केरळ, ओडिशा, तामिळनाडूमध्ये 'फनी' चक्रीवादळ धडकणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे फनी हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे.  

ठळक मुद्दे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे फनी हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. हवामान खात्याने उत्तर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीला हे चक्रीवादळ तडाखा देणार असल्याचा इशारा दिला आहे. पुढच्या 24 तासात या वादळाचे रुपांतर भीषण चक्रीवादळामध्ये होण्याची शक्‍यता आहे. 

चेन्नई - आंध्र-प्रदेश, केरळ, ओडिशा, तामिळनाडूमध्ये 'फनी' चक्रीवादळ धडकणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे फनी हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. हवामान खात्याने उत्तर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीला हे चक्रीवादळ तडाखा देणार असल्याचा इशारा दिला आहे. पुढच्या 24 तासांत या वादळाचे रुपांतर भीषण चक्रीवादळामध्ये होण्याची शक्‍यता आहे. 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 3 मे पर्यंत पद्दुचेरी, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवरील स्थिती ठीक नाही. केरळमधील काही ठिकाणी 29 आणि 30  एप्रिल रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. फनी चक्रीवादळामुळे 1 मे ते 3 मे पर्यंत तामिळनाडू आणि इतरही काही राज्यात वादळी वारे वाहणार आहेत. त्यामुळे प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या चक्रीवादळामुळे समुद्र खवळला असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे हवामान खात्याने म्हटले आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे याआधी  'गज' हे चक्रीवादळ निर्माण झाले होते. तामिळनाडूचा उत्तर भाग आणि आंध्रप्रदेशाच्या दक्षिण किनारपट्टीच्या दिशेने हे चक्रीवादळ पुढे सरकले होते. गुरुवारी (15 नोव्हेंबर) कुड्डालोर आणि श्रीहरीकोटा येथे हे चक्रीवादळ धडकण्याची शक्‍यता होती. त्यामुळे शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आली होती. तसेच भारतीय नौदल आणि तीस हजार सरकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज ठेवण्यात आले होते.

'गज' चक्रीवादळा आधी तितली चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन धडकले होते. या चक्रीवादळा दरम्यान ओडिशामध्ये प्रशासनाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. जवळपास 3 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होते. तितली हे चक्रीवादळ भयंकर असून बंगालच्या खाडीतील दक्षिण आणि पश्चिम मध्य क्षेत्राला या वादळाचा फटका बसला होता. 

जाणून घ्या कशी ठरतात चक्रीवादळांची नावं 

भारताच्या समुद्रालगत निर्माण होत असलेल्या वादळांना नाव देताना भारतीय हवामान खाते हे उपखंडातील आठ देशांसोबत संपर्क ठेवत असते. वादळाचे नाव हे सर्वांच्या संमतीने ठरविले जाते. नॅशनल हरिकेन सेंटर आणि वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन या दोन संस्थांकडून 1953 पासून वादळांची नावे ठरविली जातात. नॅशनल हरिकेन सेंटरचे कार्यालय अमेरिकेमधील मियामी येथे आहे. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनचे कार्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे आहे. दरम्यानच्या काळात उत्तर हिंद महासागरात निर्माण होत असलेल्या चक्रीवादळांना कुठलीच नावे दिली जात नव्हती. यावर भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मालदिव, ओमान, म्यानमार, श्रीलंका, थायलंड या आठ देशांनी याविषयी एक बैठक घेऊन 64 नावांची यादी तयार केली आणि प्रत्येक देशात येणाऱ्या वादळांसाठी आठ नावे सुचविण्यात आली. वादळांच्या नावांची यादी प्रत्येक देशाच्या वर्णानुक्रमानुसार आहे. चक्रीवादळांना नाव देण्याचे कारण हे की वादळ पुढे सरकताना राष्ट्रा-राष्ट्रात माहितीची देवाणघेवाण होत असते. देवाणघेवाण होत असतेवेळी एकाच वादळाला वेगवेगळ्या नावांनी ओळखले गेले तर गोंधळ निर्माण होऊ शकतो. म्हणून संबंधित भौगोलिक प्रदेशातील देशांकडून सामायिकपणे सांकेतिक नावाचा वापर केला जातो.

 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूKeralaकेरळRainपाऊस