शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Cyclone Fani : 'फनी' चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार; 11 लाख लोकांचं स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 9:21 AM

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं फनी चक्रीवादळ थोड्याच वेळात ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. सध्या भुवनेश्वर, गजपती, केंद्रपारा आणि जगतपूर सिंह परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देबंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं फनी चक्रीवादळ थोड्याच वेळात ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून प्रशासन सज्ज झाले आहे. समुद्र किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ओडिशातील किमान 10 हजार गावे आणि 52 शहरांत सावधानतेचा इशारा देण्यात आला असून 11.50 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले.

भुवनेश्वर - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं फनी चक्रीवादळ थोड्याच वेळात ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. सध्या भुवनेश्वर, गजपती, केंद्रपारा आणि जगतपूर सिंह परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, फनी चक्रीवादळ 170 ते 200 किलोमीटर प्रतितास वेगानं ओडिशाला धडकणार आहे. ओडिशातील किनारपट्टीलगतच्या 11 जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा फटका बसण्याची भीती असल्याने पुरी, गंजम, गजपती, खुर्दा, जगतसिंहपूर, केंद्रापारा, भाद्रक, जाजपूर, बालासोरा आदी जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे.

शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून प्रशासन सज्ज झाले आहे. समुद्र किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ओडिशातील किमान 10 हजार गावे आणि 52 शहरांत सावधानतेचा इशारा देण्यात आला असून 11.50 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले. निवारा सेंटर्सची उभारणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची 81 पथके सज्ज झाली आहेत. आंध्र प्रदेशामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. 

विमानसेवेवरही फनी चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून भुवनेश्वरचे विमानतळ बंद केले आहे तर शुक्रवारी सकाळपासून कोलकाता विमानतळ बंद केले जाणार आहे. चक्रीवादळाच्या परिस्थितीवर नागरी उड्डाण मंत्रालय लक्ष ठेवून असल्याची माहिती केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे.

फनी वादळाला फोनी असं देखील म्हटलं जातं. बांगलादेशनं या वादळाला फनी हे नाव दिलं. फनी या शब्दाचा अर्थ साप असा होतो. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळांना भारत, श्रीलंका, बांगलादेश, मालदिव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान आणि थायलंडकडून नावं दिली जातात. याच देशांनी वादळासाठी नावं सुचवली होती. त्या नावांमधून बांगलादेशनं सुचवलेलं नाव या वादळाला देण्यात आलं. 

200 किमीच्या वेगानं येतंय फनी चक्रीवादळ; 100 हून अधिक ट्रेन केल्या रद्द

भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे वेगाने सरकत असलेले 'फनी' चक्रीवादळ येत्या दोन दिवसांत ओडिशातील दक्षिण पुरीच्या गोपालपूर आणि चांदबली भागात धडकण्याची शक्यता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) बुधवारी (1 मे) स्पष्ट केली आहे. फनी हे चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत असल्याने याची गंभीरता लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने 100 हून अधिक गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच रेल्वेने काही गाड्यांचा रूट बदलला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व गाड्या या आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधून जातात. पाटणा-एर्नाकुलम एक्सप्रेस, नवी दिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस, हावडा-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेस, हावडा-हैदराबाद ईस्ट कोस्ट एक्सप्रेस, भुवनेश्वर-रामेश्वरम एक्सप्रेस, मुझफ्फरपूर-यशवंतपुर एक्सप्रेस, पुरी-आनंद विहार टर्मिनल नीलांचल एक्सप्रेस आणि पुरी-नवी दिल्ली पुरुषोत्तम एक्सप्रेस या गाड्या फनी चक्रीवादळामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच भुवनेश्वर, पुरी येथे जाणाऱ्या सर्व गाड्या या 2 मे पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. पुरी येथून हावडा पर्यंत जाणारी गाडी तसेच हावडा येथून बंगळुरू, चेन्नई आणि सिकंदराबादपर्यंत जाणाऱ्या सर्व गाड्या 2 मे पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच भुवनेश्वर आणि पुरी दरम्यान चालवल्या जाणाऱ्या सर्व गाड्या 3 मे पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ताशी 205 कि.मी. वेगाने तसेच 175-185 कि.मी. ताशी चक्राकार गतीने वारे वाहत असून, शुक्रवारी 3 मे रोजी दक्षिण पुरीच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याची माहिती एनडीएमएने हवामान खात्याच्या बुलेटिनच्या हवाल्याने दिली आहे.आंध्र प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, जम्मू-काश्मीर तसेच पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधील काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 40 ते 45 कि.मी. राहण्याची शक्यता आहे. काही स्थानांवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची(एनडीआरएफ)मदत चमू तसेच नौदल आणि तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर्स तैनात असतील.आपत्ती व्यवस्थापन समितीची तातडीची बैठकमंत्रिमंडळ सचिव पी. के. सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पहिल्या बैठकीतील निर्णयाच्या आधारावर व्यवस्थापनाबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने एका निवेदनात दिली आहे. केंद्र सरकारने प्रतिबंधात्मक आणि मदत योजनेंतर्गत तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि प. बंगालसाठी 1086 कोटींची मदत जारी केली आहे.पर्यटकांना पुरी सोडून जाण्याचा आदेशफनी चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता ओडिशा सरकारने पर्यटकांना पुरी सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे. ओडिशातील संपूर्ण शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात येतील. हवामान विभागाने ओडिशा किनारपट्टी भागात ‘यलो वॉर्निंग’ जारी केल्यानंतर रस्ते आणि रेल्वे वाहतूक स्थगित किंवा वळती करण्याचा पर्याय अवलंबला जाणार आहे. किनारपट्टी भागात मासेमारी थांबविण्यात आली असून, लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याची सूचना करण्यात आली आहे.एनडीआरएफच्या 41 चमूंची तैनातीआंध्र प्रदेश (8), ओडिशा(28), प. बंगाल (5) अशा 41 चमू एनडीआरएफ तैनात करणार असून, प. बंगालसाठी 13 तर आंध्र प्रदेशसाठी 10 चमू राखीव असतील. एका चमूत 45 जवान असतील. 

टॅग्स :Fani Cyclone फनी वादळAndhra Pradeshआंध्र प्रदेशwest bengalपश्चिम बंगालOdishaओदिशा