Cyclone Amphan : ‘अम्फॉन’ पश्चिम बंगाल किनारपट्टीवर आज धडकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 07:27 IST2020-05-20T05:00:24+5:302020-05-20T07:27:08+5:30
महाचक्रीवादळ मंगळवारी पश्चिम बंगालमधील दिघापासून ५१० किमी, ओडिशातील दक्षिण पारादीपपासून ३६० किमी आणि बांगलादेशातील खेपुपारा येथून ६५० किमी दूर होते़

Cyclone Amphan : ‘अम्फॉन’ पश्चिम बंगाल किनारपट्टीवर आज धडकणार
पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले महाचक्रीवादळ ‘अम्फॉन’ आता अतिशय धोकादायक झाले असून, बुधवारी ते पश्चिम बंगालमधील दिघा ते बांगलादेशातील हटियादरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे़ यामुळे किनारपट्टीवरील राज्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. महाचक्रीवादळ मंगळवारी पश्चिम बंगालमधील दिघापासून ५१० किमी, ओडिशातील दक्षिण पारादीपपासून ३६० किमी आणि बांगलादेशातील खेपुपारा येथून ६५० किमी दूर होते. गेल्या ६ तासांपासून ते ताशी १८ किमी वेगाने किनाऱ्याकडे येत आहे़