राेजगारनिर्मितीचे चक्रही गतिमान; डिसेंबरमध्ये ४४ टक्के नवे सदस्य वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 01:10 AM2021-02-22T01:10:38+5:302021-02-22T01:10:48+5:30

ईपीएफओची आकडेवारी; डिसेंबरमध्ये ४४ टक्के नवे सदस्य वाढले

The cycle of job creation is also accelerating | राेजगारनिर्मितीचे चक्रही गतिमान; डिसेंबरमध्ये ४४ टक्के नवे सदस्य वाढले

राेजगारनिर्मितीचे चक्रही गतिमान; डिसेंबरमध्ये ४४ टक्के नवे सदस्य वाढले

Next

नवी दिल्ली : काेराेना महामारीमुळे बेराेजगारीचेही माेठे संकट निर्माण झाले हाेते. मात्र, त्याबाबत एक दिलासादायक बातमी आहे. अर्थव्यवस्थेची चाके सुरू हाेतानाच राेजगारनिर्मितीचेही चक्र गतिमान झाल्याचे दिसून येत आहे.  नुकतेच प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार ‘ईपीएफओ’च्या नव्या सभासदांच्या संख्येत डिसेंबरमध्ये ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये एकूण १२.५४ नवे सदस्य ‘ईपीएफओ’मध्ये जाेडले गेले आहेत. 

उपलब्ध आकडेवारीनुसार, ‘ईपीएफओ’ने नाेव्हेंबरमध्ये ६.४१ नवे सदस्य नाेंदविले हाेते. त्यात डिसेंबरमध्ये माेठी वाढ झाली आहे, तसेच डिसेंबर २०१९च्या तुलनेतही २४ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे काेराेनापूर्व परिस्थिती परत येत असल्याचे हे संकेत असल्याचे कामगार मंत्रालयाने म्हटले आहे. हरयाणा, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांचा यात सर्वाधिक वाटा आहे. 

मावळत्या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत ५३.७० लाख नवे सदस्य नाेंदविण्यात आले, तर ऑक्टाेबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीत दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत २२ टक्के वाढ झाली. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर  भारत याेजना, पंतप्रधान गरीब कल्याण याेजना, तसेच  पंतप्रधान राेजगार प्राेत्साहन याेजना यासारख्या पुढाकारांमुळे ही वाढ झाल्याचे कामगार मंत्रालयाचे म्हणणे आहे. 

नोकरीवर लागले परतू

डिसेंबर २०२० मध्ये ८.०४ लाख नवे सदस्य झाले, तर ४.५ लाख सदस्य पुन्हा सामील झाले. या सदस्यांनी नाेकरी बदलली, तसेच निधी न काढता नव्या संस्थेच्या ईपीएफ खात्यात वळविला, तसेच अनेक सदस्य नाेकरीवर परतू लागल्याचेही  हे संकेत आहेत. नव्या सदस्यांमध्ये 
१.८३ लाख महिला आहेत. डिसेंबर महिन्यात झालेली वाढ ही लक्षणीय आहे.

नवे सदस्य  

एप्रिल ते डिसेंबर- ५३.७० लाख 
डिसेंबर- १२.५४ लाख
नाेव्हेंबर- ६.४१ लाख
डिसेंबरचे चित्र
नवे सदस्य - ८.०४ लाख
पुन्हा सहभागी- ४.५ लाख
नव्या महिला सदस्य- १.८३ लाख

Web Title: The cycle of job creation is also accelerating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.