शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची रॉकडून चौकशी करा- धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 07:51 IST

मुंडे यांची हत्या झाल्याच्या दाव्यानं देशातल्या राजकारणात खळबळ

मुंबई: गेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक करण्यात आल्याची माहिती असल्यानंच भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा दावा एका सायबर तज्ज्ञानं केला आहे. या खळबळजनक दाव्यामुळे देशातलं राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणाची चौकशी रॉ किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं ईव्हीएम हॅक करुन विजय मिळवल्याचा दावा अमेरिकन सायबर तज्ज्ञानं केला. या संपूर्ण प्रकरणाची कल्पना असल्यानंच गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आल्याचा दावाही त्यानं केला. याबद्दल धनंजय मुंडेंनी आश्चर्य व्यक्त केलं. 'गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांनी नेहमीच त्यांच्या मृत्यूबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू हा अपघात होता की अपघात, याची चौकशी व्हायला हवी,' अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे. 'गोपीनाथराव मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा एका सायबर तज्ज्ञानं केला आहे. या दाव्याची रॉ किंवा सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी झाली पाहिजे. कारण ही माहिती एका लोकनेत्याशी संबंधित आहे,' असं मुंडेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या हॅकेथॉनमध्ये सईद सूजा या अमेरिकन सायबर तज्ज्ञानं ईव्हीएम मशीन हॅक केल्या जाऊ शकतात, असा दावा केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत हॅकिंग झाल्याचा आणि त्याची कल्पना असल्यानंच मुंडेंची हत्या करण्यात आल्याचंही सूजा म्हणाला. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरातमधील निवडणुकांवेळीही ईव्हीएम हॅक झाल्याचा दावा त्यानं केला. ग्रॅफाईट आधारित ट्रान्समीटरच्या मदतीनं ईव्हीएम उघडता येऊ शकतं. याच ट्रान्समीटर्सचा वापर 2014 मध्ये करण्यात आला होता, असं सूजा म्हणाला.  

टॅग्स :Gopinath Mundeगोपीनाथ मुंडेlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकDhananjay Mundeधनंजय मुंडे