भाजीपाला लागवड ठरली शेतकऱ्यांना फायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 01:28 IST2020-07-07T00:09:23+5:302020-07-07T01:28:59+5:30
नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी बारमाही भाजीपाला पिके करतात. त्यामुळे रोजच्या रोज घरखर्चासाठी रोख पैसा मिळतो. या भागात दक्षिणेला दारणा व उत्तरेला गोदावरी नदी असल्याने शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. त्यामुळे परिसरातील शेतकरी टमाटे, कोबी, फ्लॉवर, मेथी, शेपू, भेंडी, गवार, कारले, गिलके, दोडके, भोपळा, कोथिंबीर हा नगदी भाजीपाला बारमाही घेतात.

भाजीपाला लागवड ठरली शेतकऱ्यांना फायदेशीर
एकलहरे : नाशिक तालुका पूर्व भागातील शेतकरी बारमाही भाजीपाला पिके करतात. त्यामुळे रोजच्या रोज घरखर्चासाठी रोख पैसा मिळतो. या भागात दक्षिणेला दारणा व उत्तरेला गोदावरी नदी असल्याने शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. त्यामुळे परिसरातील शेतकरी टमाटे, कोबी, फ्लॉवर, मेथी, शेपू, भेंडी, गवार, कारले, गिलके, दोडके, भोपळा, कोथिंबीर हा नगदी भाजीपाला बारमाही घेतात.
एकलहरे परिसरातील सामनगाव, कोटमगाव, मोहगाव, बाभळेश्वर, चांदगिरी, जाखोरी, हिंगणवेढे या परिसरात टमाट्यचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. वावरात सºया करून, मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन पसरून, त्यावर होल पाडून नर्सरीतून आणलेली टमाटा रोपे लावली जातात. या भागात खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तीनही हंगामात टमाट्याची लागवड केली जाते. टमाट्याची पुसा रु बी, भाग्यश्री, वैशाली, रूपाली आदी प्रकारचे वाणलागवड केली जाते. एकरी सहा ते सात हजार रोपे लागवड होते. लागवडीनंतर पंधरा दिवसांनी बुरशी नाशक फवारणी केली जाते. ६० ते ६५ दिवसांनी पहिली तोडणी सुरू होते. एका झाडाला सुमारे २० ते २५ किलो शेतमाल निघतो. सायखेडा, नाशिक, पिंपळगाव मार्केटला अथवा थेट कंपनीला माल विकला जातो, असे येथील शेतकरी पप्पू जगताप यांनी सांगितले.
या भागातील बहुतांश शेतकरी रोखीचे पीक म्हणून भेंडीची लागवड करतात. वावरात नांगरटी करून सºया तयार करून भेंडीच्या एकेक बियांची टोचन पद्धतीने लागवड केली जाते. सामनगाव, कोटमगाव शिवारात भेंडी लागवड मोठ्या प्रमाणात होते. राधिका, कावेरी, लावण्या, ताज या प्रकारचे भेंडीचे वाण लावले जातात. वेळेवर कीडनाशक फवारणी करून चांगली निगा राखली, तर सुमारे दीड महिन्यानंतर फुलकळी लागते, तर दोन महिन्यांत खुडणी सुरू होते. एका क्रे टमध्ये साधारण दहा किलो भेंडी बसते. २५० ते ३०० रु पये प्रमाणे क्रे टची विक्र ी होते. येथील शेतकरी नाशिकरोड स्थानिक भाजी बाजारात भेंडीची विक्र ी करतात. त्यामुळे रोख पैसा हातात मिळत असल्याने घरगुती किराणा, दैनंदिन गरजा भागवण्यास हातभार लागतो, असे सामनगावचे शेतकरी तानाजी जगताप यांनी सांगितले.