शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

क्रुररता! दारू पिण्यासाठी बापाने विकले 1 महिन्यांच्या मुलाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 23:55 IST

एका व्यक्ती 11 महिन्याच्या पोटच्या पोराला दारुसाठी पैशै नसल्यामुळे विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बापाच्या या क्रुररतेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली, दि. 14 - एका व्यक्ती 11 महिन्याच्या पोटच्या पोराला दारुसाठी पैशै नसल्यामुळे विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बापाच्या या क्रुररतेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दारू पिण्यासाठी आणि मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी बापाने आपल्या अवघ्या 11 महिन्यांच्या मुलाला फक्त 25 हजार रूपयांना विकले. ओडिशातील भद्रक जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. बलराम मुखी असे या नराधम बापाचे नाव आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. दारू आणि मोबाईल खरेदी करण्यासाठी त्याने 11 महिन्यांचे बाळ 25 हजार रूपयांना विकले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मुलाच्या विक्रीतून मिळालेल्या 25 हजार रूपयांतून त्याने दोन हजार रूपयांचा फोन आणि आपल्या मुलीसाठी त्याने 1500 रूपयांचे पैंजण खरेदी केले. उर्वरित पैसे त्याने दारूवर खर्च केले, असेही पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी मुखीच्या पत्नीचीही चौकशी केली. त्यांना आणखी एक मुलगा आहे. मुखी हा सफाई कर्मचारी आहे. त्याच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. त्यात त्याला दारूचे व्यसन आहे.या प्रकरणात त्याचा मेहुणा बलिया आणि अंगणवाडी कर्मचारीही सामील आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक अनुप साहू यांनी दिली.सोमनाथ सेठी नावाच्या व्यक्तीला त्याने आपले मूल विकल्याची माहिती समोर आली आहे. सेठीच्या 24 वर्षांच्या मुलाचा पाच वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूचा धक्का सेठी आणि त्याच्या पत्नीला बसला. या धक्क्यातून सावरण्यासाठी सेठी याने मुखीकडून 11 महिन्यांचे मूल विकत घेतले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे