सीआरपीएफ जवानानं स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 17:49 IST2018-10-24T17:48:27+5:302018-10-24T17:49:23+5:30
छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित सुकमा जिल्ह्यातील सीआरपीएफच्या जवानानं आपल्या सर्विस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

सीआरपीएफ जवानानं स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या
रायपूर - छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित सुकमा जिल्ह्यातील सीआरपीएफच्या जवानानं आपल्या सर्विस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. जवानाच्या आत्महत्येमागील कारण अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नाही. कुलदीप सिंह असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुकमा जिल्ह्यातील सीआरपीएफच्या दुसऱ्या बटालियन मुख्यालयात कुलदीप सिंह यांनी स्वतःवर सर्विस रायफलमधून गोळी झाडली.
बुधवारी (24 ऑक्टोबर) सकाळी बटालियन मुख्यालयात गोळीबाराचा आवाज ऐकू आला. यावेळी सर्वांनी कुलदीप सिंह यांच्या बॅरेककडे धाव घेतली. तेथे पोहोचल्यानंतर सिंह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सिंह यांना मृत घोषित केले.
कुलदीप सिंह हे हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील सतनाली गावातील रहिवासी होते. त्याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, सिंह यांनी आत्महत्या का केली?, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.