काश्मीरमध्ये CRPF ताफ्यावर हल्ला, ६ जवान जखमी

By Admin | Updated: December 7, 2015 11:40 IST2015-12-07T11:20:55+5:302015-12-07T11:40:20+5:30

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमधील बीजबेहरा येथे काही दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या पथकावर केलेल्या हल्ल्यात ६ जवान जखमी झाले.

CRPF attack in Kashmir, 6 soldiers injured | काश्मीरमध्ये CRPF ताफ्यावर हल्ला, ६ जवान जखमी

काश्मीरमध्ये CRPF ताफ्यावर हल्ला, ६ जवान जखमी

ऑनलाईन लोकमत 

श्रीनगर, दि. ७ - दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यामध्ये श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी अज्ञात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात सीआरपीएफचे सहा जवान जखमी झाले आहेत. 

सीआरपीएफ जवानांची बस श्रीनगरहून जम्मूच्या दिशेने जात असताना दहशतवाद्यांनी बिजबेहरा जवळील समथान येथे हा हल्ला केला. श्रीनगरपासून ५० कि.मी. अंतरावर ही घटना घडली. जखमी झालेल्या सहा जवानांना अनंतनाग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ला झालेल्या ठिकाणाला सुरक्षापथकांनी घेराव घालून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहिम सुरु केली आहे. 

Web Title: CRPF attack in Kashmir, 6 soldiers injured