श्रीनाथ म्हस्कोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:17+5:302015-03-20T22:40:17+5:30
अमावास्येनिमित्त : वीरला गुढी पाडव्यानिमित्त होणार गर्दी

श्रीनाथ म्हस्कोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
अ ावास्येनिमित्त : वीरला गुढी पाडव्यानिमित्त होणार गर्दी खळद : श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या दर्शनासाठी फाल्गुन अमावास्येनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी देऊळवाड्यात मोठी गर्दी केली होती. उद्याही गुढी पाडव्यानिमित्त गर्दी होणार आहे.उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, रखरखत्या उन्हाची पर्वा न करता भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करीत होते. या वेळी भाविकांना दिलासा मिळावा यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिर परिसरात नेट जाळी बांधण्यात आली होती.शुक्रवारी पहाटे ४.३० वाजता पूजा करून मुख्य गाभारा बंद करण्यात आला. यानंतर सकाळी ६ वाजता गाभारा भाविकांना दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळपासूनच देऊळवाड्याच्या महाद्वारापर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लाब रांगा पाहावयास मिळाल्या.सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविक यांच्याकडून देवाला अभिषेक करण्यात आला. देवाला सकाळी १० वाजता भाविकांच्या दहिभाताच्या पूजा बांधण्यात आल्या. दुपारी १२ वाजता धुपारती करून १.१५ पर्यंत पुन्हा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. देऊळवाड्यात दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळींचा पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता.भाविकांसाठी वीर येथील किरण धुमाळ, शशिकांत चव्हाण, बाळासाहेब कुदळे, विठ्ठल धुमाळ, शिवाजी गारडी यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. वीर देवस्थान ट्रस्टतर्फे येणार्या भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, दर्शनबारी, वाहनतळ, स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवक, लाईट व जनरेटर आदी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती चेअरमन बाळासाहेब धुमाळ यांनी दिली. या कामी सचिव तय्यद मुलाणी, व्हा. चेअरमन संभाजी धुमाळ, विश्वस्त दिलीप धुमाळ, मंगेश धुमाळ, ज्ञानेश्वर धुमाळ, नामदेव जाधव, बबन धसाडे, अशोक वचकल, सुभाष समगीर यांनी व्यवस्था पाहिली. फोटो : गुढी पाडव्याला म्हणून पारंपरिक पद्धतीने आज वडाच्या पानात धान्याच्या बारा पुड्या, अड्या ठेवल्या जातात व गुढी पाडव्याच्या दिवशी देवाला अलंकारिक पोषाख करून सकाळी ९ वाजता ग्रामस्थ, मानकरी, पुरोहित यांच्या उपस्थितीत पंचांग वाचन व या पुड्या उघडून बारमाही होणार्या पावसाचे, पिकांचे अडीवाचन करून भाकीत केले जाते. या वेळी परिसरातील भाविक मोठी गर्दी करतात.