महाशिवरात्रीनिमित्त जेजुरीत एक लाखावर भाविकांची गर्दी
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:16+5:302015-02-18T00:13:16+5:30
जेजुरी : महाशिवरात्रीनिमित्त जेजुरी गडावर त्रैलोक्याचे दर्शन घेण्यासाठी एक लाखावर भाविकांनी गर्दी केली होती. सदानंदाच्या जयघोषात भंडार खोबर्याच्या उधळणीत भाविकांनी महाशिवरात्रीचे पुण्य पदरात पाडून घेतले.

महाशिवरात्रीनिमित्त जेजुरीत एक लाखावर भाविकांची गर्दी
ज जुरी : महाशिवरात्रीनिमित्त जेजुरी गडावर त्रैलोक्याचे दर्शन घेण्यासाठी एक लाखावर भाविकांनी गर्दी केली होती. सदानंदाच्या जयघोषात भंडार खोबर्याच्या उधळणीत भाविकांनी महाशिवरात्रीचे पुण्य पदरात पाडून घेतले. जेजुरी गडावरील मुख्य मंदिराच्या कळसात असणारे स्वर्गलोकीचे शिवलिंग, गाभार्यातील भूलोकीचे शिवलिंग आणि तळघरातील पाताळलोकींचे शिवलिंग असा तिहेरी दर्शनाचा योग आज येथे आलेल्या भाविकांनी साधला. आज मध्यरात्री १२ वाजता शिखरातील तसेच तळघरातील शिवलिंगे उघडण्यात आली. एकच्या सुमारास महापूजा व अभिषेक व मानाच्या पूजा घालण्यात आल्या. मानकरी वासकर व सोनवणे परिवारासह देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, विश्वस्त ॲड. वसंत नाझीरकर, उपनगराध्यक्ष गणेश आगलावे, स.पो.नि. रामदास शेळके, नगरसेवक जयदीप बारभाई, तसेच पुजारी, सेवकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते. या नंतर पहाटे दोननंतर भविकांच्या दर्शनासाठी ही शिवालये खुली करण्यात आली. भाविकांनी रांगा लावून देवदर्शन घेतले. आज दिवसभर भाविकांची गडावर मोठी गर्दी होती. जेजुरी गडाबरोबरच जुनागड, कडेपठार मंदिरातही भाविकांची गर्दी होती. शहारालगतची प्राचीन शिवमंदिरे लवथळेश्वर, बल्लाळेश्वर, भुलेश्वर, पांडेश्वर, साकुर्डे येथील रामेश्वर, शंकरेश्वर, आदी ठिकाणीही भाविकांची गर्दी होती. यात्राकाळात भाविकांना देवदर्शन सुलभ व्हावे म्हणून जेजुरी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ४ पोलीस अधिकारी व ७० पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. देव संस्थानच्या वतीने भविकांसाठी दर्शनरांग, फराळ वाटप, तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध केली होती. तसेच सी.सी.टी.व्ही.द्वारे मंदिर परिसर व गडाच्या पायथ्याशी देवदर्शनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. संपूर्ण गड व कडेपठार डोंगर गर्दीने फुलून गेला होता. उद्या बुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत भाविकांसाठी ही तीनही शिवालये दर्शनासाठी खुली राहणार आहेत. फोटो मेल केले आहेत.महाशिवरात्रीनिमित्त जेजुरी गडावर भाविकांच्या दर्शनासाठी लागलेली रांग व गर्दी.(संपादन : बापू बैलकर)