भाविकांची गर्दी ओसरली ; आखाडयात पोलीसांनी मांडली बैठक

By Admin | Updated: September 6, 2015 23:09 IST2015-09-06T23:09:20+5:302015-09-06T23:09:20+5:30

पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळयाची पहिली शाही स्नान पर्वणी आटोपल्यानंतर स्नानासाठी आलेले भाविक आपापल्या घराकडे माघारी फिरल्याने सध्या तपोवन साधूग्राम परिसरात शुकशुकाट पसरलेला आहे. गेल्या तिन ते चार दिवसांपासून तपोवनात येणार्‍या भाविकांची गर्दी ओसरल्यामुळे साधूमहंतांचे आखाडे ओस पडले आहे. बंदोबस्तानिमित्ताने बाहेरगावाहून आलेल्या पोलीस कर्मचारी दुपारच्यावेळी आखाडयांच्या मोकळया जागेत बैठक मांडत असल्याचे चित्र दिसुन येते.

The crowd of devotees disappeared; A meeting organized by the police in the Akhaad | भाविकांची गर्दी ओसरली ; आखाडयात पोलीसांनी मांडली बैठक

भाविकांची गर्दी ओसरली ; आखाडयात पोलीसांनी मांडली बैठक

चवटी : सिंहस्थ कुंभमेळयाची पहिली शाही स्नान पर्वणी आटोपल्यानंतर स्नानासाठी आलेले भाविक आपापल्या घराकडे माघारी फिरल्याने सध्या तपोवन साधूग्राम परिसरात शुकशुकाट पसरलेला आहे. गेल्या तिन ते चार दिवसांपासून तपोवनात येणार्‍या भाविकांची गर्दी ओसरल्यामुळे साधूमहंतांचे आखाडे ओस पडले आहे. बंदोबस्तानिमित्ताने बाहेरगावाहून आलेल्या पोलीस कर्मचारी दुपारच्यावेळी आखाडयांच्या मोकळया जागेत बैठक मांडत असल्याचे चित्र दिसुन येते.
सिंहस्थ कुंभमेळयाच्या पहिल्या शाहीस्नापूर्वी भाविकांनी तपोवन साधूग्राममध्ये मोठी गर्दी केल्याने भाविकांना रात्री काढण्यासाठी रस्त्याचा तसेच पादचारी मार्ग, मंदीर मठांचा आधार घ्यावा लागला होता मात्र आता पहिल्या पर्वणीनंतर भाविक आपापल्या गावाकडे रवाना झाल्याने शुकशुकाट पसरल्याने आठवडयाभरापूर्वी भाविकांच्या गर्दीने फुलणारे तपोवन काहीसे ओस पडलेले आहे. दुपारच्यावेळी तर शुकशुकाट पसरत असल्याने बंदोबस्तासाठी आलेले पोलीस कर्मचारी एकमेकांशी गप्पा मारत मस्तपणे आखाडयाच्या मोकळया जागेतच बैठक मांडतात तर काहीजण थकवा दूर करण्यासाठी आखाडयातच निद्राधिन होत आहे. दुपारी भाविकांची गर्दी नाही त्यातच उन्हाचा तडाखा यामुळे ऐरवी रस्त्यावर तसेच आखाडे व खालशांच्या बाहेर बंदोबस्त करणार्‍या पोलीसांना भाविकांची गर्दी ओसरल्याने आरामाची संधीच प्राप्त झाली आहे. (वार्ताहर)

Web Title: The crowd of devotees disappeared; A meeting organized by the police in the Akhaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.