ट्रकची तोडफोड करणारे गजाआड

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:32+5:302015-08-26T23:32:32+5:30

पुणे : कोचीन येथून प्लायवुड भरुन पुण्यात आलेल्या ट्रकचालकावर तलवारीने वार करीत ट्रकची तोडफोड करणा-या टोळीतील पाच जणांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान घडली.

Cross-section | ट्रकची तोडफोड करणारे गजाआड

ट्रकची तोडफोड करणारे गजाआड

णे : कोचीन येथून प्लायवुड भरुन पुण्यात आलेल्या ट्रकचालकावर तलवारीने वार करीत ट्रकची तोडफोड करणा-या टोळीतील पाच जणांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान घडली.
सागर महादेव गायकवाड (वय 22), शंभो बाबु मदारी (वय 24), सचिन ऊर्फ मामा कचरु कांबळे (वय 20), सचिन काका पवळे (वय 22), सागर सुभाष गायकवाड (सर्व रा. कासेवाडी, भवानी पेठ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुनिल खराडे (वय 35, रा. कोनेगाव, ता. कराड, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडे कोचीन येथून प्लायवुड भरुन पुण्यामध्ये आले होते. पत्ता शोधण्यासाठी ते नेहरु रस्त्यावरील टिंबर मार्केट मधील पेट्रोल पंपासमोर उभे होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना तलवार आणि काठ्यांचा धाक दाखवत मौल्यवान ऐवज काढून देण्यास सांगितले.
ट्रकच्या दरवाजावर तसेच खराडे यांच्या कंबरेवर तलवारीने वार करुन ट्रक मालकाचा मुलगा आमीर शेख याच्यावर हल्ला केला. ट्रकचे आरसे आणि काचा फोडून सात हजार रुपयांचे नुकसान केले. घाबरलेल्या खराडे यांनी ट्रक तसाच पुढे रामोशी गेट चौकात आणला. आरोपींनी त्यांचा पाठलाग सुरु केल्यावर गस्तीवरील पोलिसांनी आरोपींना पकडले. पुढील तपास सहायक निरीक्षक ए. इप्पर करीत आहेत.

Web Title: Cross-section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.