राज्यात पीक जमीनदोस्त-बॉक्स
By Admin | Updated: March 2, 2016 02:21 IST2016-03-02T02:21:46+5:302016-03-02T02:21:46+5:30
बातमीचा सुधारित बॉक्स, आधीचा काढणे.

राज्यात पीक जमीनदोस्त-बॉक्स
ब तमीचा सुधारित बॉक्स, आधीचा काढणे. -------------दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यूराज्यात गेल्या दोन दिवसांत वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला तर अन्य एका दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. बुलडाण्यातील देऊळघाट शिवारात सोमवारी वीज पडून दहावीचा विद्यार्थी शे. सुलतानचा मृत्यू झाला. त्याचा मित्र सोहिल जखमी झाला. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी दुपारी वीज कोसळून मालेगावमध्ये शेख इम्रान शेख फिरोज (१४) व कळवण तालुक्यातील मानूर येथे शितल अशोक हळदे (१८) हिचा मृत्यू झाला. सोमवारी मालेगावात जाखोटीया भवन येथे वादळी वाऱ्यामुळे सुबाभळीचे झाड पडून शेख अबुजहर शेख हसन (१२) हा ठार झाला. अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारी अंगावर वीज पडून पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील बन्सी किसन गोसावी (५४) यांचा जागीच मृत्यू झाला. नगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात हिंगणगाव येथे न्यू फलटण शुगर कारखान्याची ऊसतोड महिला कामगार महिला जयश्री सुरेश थोरात (३५) यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. दुर्घटनेत चार महिला जखमी झाल्या.