शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आता 'या' राज्यात होणार कर्नाटकची पुनरावृत्ती?; काँग्रेसला सत्ता जाण्याची भीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 22:04 IST

भाजपाकडून पुन्हा एकदा 'ऑपरेशन लोटस' राबवलं जाण्याची शक्यता

भोपाळ: भाजपाचं ऑपरेशन लोटस कर्नाटकमध्ये यशस्वी झालं. बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्यानं मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामींनी पदाचा राजीनामा दिला. काँग्रेस, जेडीएसच्या १५ आमदारांनी राजीनामे दिल्यानं कर्नाटक सरकार अडचणीत आलं होतं. अखेर आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. त्यात ९९ आमदारांनी सरकारच्या बाजूनं, तर १०५ आमदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केलं. कर्नाटकमधील ऑपरेशन लोटस यशस्वी झाल्यानंतर आता मध्य प्रदेशात 'ऑपरेशन कमलनाथ' राबवलं जाण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात कर्नाटकची पुनरावृत्ती होण्याची भीती काँग्रेस आमदारांना वाटत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सूचक विधान केलं. 'आम्ही इथे (मध्य प्रदेशात) सरकार पाडणार नाही. काँग्रेस सरकार पडण्यास त्यांचेच नेते जबाबदार आहेत. राज्यात काँग्रेस आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या बसपा-सपामध्ये अंतर्गत वाद आहेत. त्यामुळे या ठिकाणी काही घडल्यास आम्ही काहीही करू शकत नाही,' असं म्हणत चौहान यांनी अप्रत्यक्षपणे 'ऑपरेशन लोटस'चे संकेत दिले आहेत.कर्नाटक प्रमाणे मध्य प्रदेशात भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष नसला, तरी काँग्रेस आणि भाजपाच्या जागांमध्ये फारसा फरक नाही. गेल्या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक झाली. त्यात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. २३० सदस्यसंख्या असलेल्या मध्य प्रदेशच्या विधानसभेत काँग्रेसचे ११४, भाजपाचे १०९ आमदार आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी ११६ आमदारांचा पाठिंबा आवश्यक असतो. सध्या सपा-बसपाच्या पाठिंब्यानं काँग्रेसनं सत्तेत असून मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कमलनाथ यांच्याकडे आहे. कर्नाटकप्रमाणेच मध्य प्रदेशात काँग्रेसच्या नाराज आमदारांनी राजीनामे दिल्यास राज्याची सत्ता भाजपाला मिळू शकते.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा