्रक्रीडा : न्यू इंग्लिश हायस्कूलने पटकावला सुब्रतो मुखर्जी चषक

By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:35+5:302015-08-03T22:26:35+5:30

मांद्रे : पेडणे येथे शासकीय मैदानावर खेळविण्यात आलेल्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत 17 वर्षांखालील गटाचे विजेतेपद केरी-तेरेखोल येथील न्यू इंग्लिश हायस्कूलने पटकावले. त्यांनी अंतिम फेरीत डॉन बॉस्को हायस्कूल तुयेला पराभूत केले. उपांत्य फेरीत पार्से हायस्कूल पार्सेला हरवून अंतिम फेरी गाठली.

Crimea: Submitted to New English High School, Subroto Mukherjee Cup | ्रक्रीडा : न्यू इंग्लिश हायस्कूलने पटकावला सुब्रतो मुखर्जी चषक

्रक्रीडा : न्यू इंग्लिश हायस्कूलने पटकावला सुब्रतो मुखर्जी चषक

ंद्रे : पेडणे येथे शासकीय मैदानावर खेळविण्यात आलेल्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत 17 वर्षांखालील गटाचे विजेतेपद केरी-तेरेखोल येथील न्यू इंग्लिश हायस्कूलने पटकावले. त्यांनी अंतिम फेरीत डॉन बॉस्को हायस्कूल तुयेला पराभूत केले. उपांत्य फेरीत पार्से हायस्कूल पार्सेला हरवून अंतिम फेरी गाठली.
न्यू इंग्लिश हायस्कूलच्या संघात सागर कोरखणकर, सुहित तळकर, जगन्नाथ सोमजी, लुईस डायस, कृष्णा नागोजी, मॅकन डिसोझा, स्टेनली मेंडीस, प्रणय हर्जी, अभिषेक नाईक, प्रतीक झालबा, विजेश हर्जी, आरोन रॉड्रिगीस, यश बाबरेकर, आकाश तळकर, दीपेश केरकर व दिनेश नार्वेकर या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या विजयाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उल्हास केरकर व मुख्याध्यापिका बर्था फर्नांडिस यांनी शारीरिक शिक्षक आल्फ्रेड रॉड्रिगीस व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)
फोटो : विजेत्या खेळाडूंसमवेत मुख्याध्यापिका बर्था फर्नांडिस, अध्यक्ष उल्हास केरकर, शारीरिक शिक्षक आल्फ्रेड रॉड्रिगीस.
(0308-एमएपी-15)

Web Title: Crimea: Submitted to New English High School, Subroto Mukherjee Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.