हृदयद्रावक! मुलगी झाली म्हणून पत्नीची हत्या; बाळाला आईच्या मृतदेहाशेजारी ठेवून पती फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 03:16 PM2022-01-24T15:16:34+5:302022-01-24T15:27:03+5:30

Crime News : बाळाच्या जन्माच्या 48 तासांनतर माथेफिरू पतीने पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली. पत्नीच्या मृतदेहा शेजारीच मुलीला सोडून तो पसार झाला.

Crime News woman gave birth to daughter husband killed wife | हृदयद्रावक! मुलगी झाली म्हणून पत्नीची हत्या; बाळाला आईच्या मृतदेहाशेजारी ठेवून पती फरार

हृदयद्रावक! मुलगी झाली म्हणून पत्नीची हत्या; बाळाला आईच्या मृतदेहाशेजारी ठेवून पती फरार

Next

नवी दिल्ली - बिहारमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. पत्नीने मुलीला जन्म दिला म्हणून पतीने थेट पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळाच्या जन्माच्या 48 तासांनंतर माथेफिरू पतीने पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली. पत्नीच्या मृतदेहा शेजारीच मुलीला सोडून तो पसार झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. महिलेच्या माहेरच्या सदस्यांना जेव्हा याबाबत कळालं त्यानंतर ते हादरलेच. माहेरची मंडळी तातडीने मुलीच्या सासरी पोहोचली. तर तेथे कोणीच नव्हतं. 

मुलीचा मृतदेह पडला होता आणि मुलीच्या मृतदेहाशेजारी बाळ रडत होतं. घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुंडा न दिल्याने तिची हत्या करण्यात आली आहे. दुसरीकडे आरोपींचा शोध घेतला जात आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 एप्रिल 2021 रोजी पाटणा येथील बिंद टोला परिसरात राहणाऱ्या लक्ष्मण कुमारसह शोभाचं लग्न झालं होतं. लग्नानंतर लक्ष्मण तिला हुंड्यासाठी छळ करीत होता. तिला मारहाणही केली जात होती. यासाठी गावात अनेकदा पंचायतदेखील बोलवली गेली होती. 

पंचायतीत चांगलं वागणार असल्याचं सांगूनही तो शोभाला मारहाण करीत होता. याच दरम्यान शुक्रवारी शोभाने एका मुलीला जन्म दिला. मुलीला जन्म दिला म्हणून शोभाला पुन्हा सासरच्या मंडळींची बोलणी ऐकावी लागली. तिचा पती आणि सासरचे लोक नाराज झाले. तिला त्रास देऊ लागले. शनिवारी रात्री जेव्हा शोभाने याला विरोध केला तर तिची गळा दाबून हत्या करण्यात आली, अशी माहिती समोर येत आहे. शोभाच्या आई-वडिलांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करा अशी मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Crime News woman gave birth to daughter husband killed wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.