क्राईम फाईल ....
By admin | Updated: April 14, 2015 00:05 IST
तरुणाची आत्महत्या
क्राईम फाईल ....
तरुणाची आत्महत्या नागपूर : हुडकेश्वरच्या महालक्ष्मीनगरात राहणारा अक्षय प्रकाशराव पातूरकर (वय २७) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ९.३० वाजता ही घटना उघडकीस आली. हुडकेश्वर पोलीस पातूरकरच्या आत्महत्येचा तपास करीत आहेत.----तरुणाचा आकस्मिक मृत्यू नागपूर : बौद्धविहारात साफसफाईचे काम करताना अचानक प्रकृती खालावल्यामुळे राजू रामदास रामटेके (वय ३०) या तरुणाची प्रकृती ढासळली आणि रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास पाचपावलीतील पंचशीलनगरात ही घटना घडली. ----- पेटवून घेत आत्महत्यानागपूर : स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतल्यामुळे राजेश यादव (वय ५५, रा. डिप्टी सिग्नल) यांचा मृत्यू झाला. यादवने ३ एप्रिलला पेटवून घेतले होते. मेयोत सोमवारी पहाटे २.३० वाजता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. कळमना पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.--- विवाहितेने लावला गळफास नागपूर : कळमना जामनगर (भरतवाडा) य्येथील रहिवासी मंगला यशवंत आमधरे (वय ३६) हिने गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ९.३० ते १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. यशवंत ताराचंद आमधरे (वय ४२) यांच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.