अनिल अंबानींचा पुत्र जय अनमोलवर गुन्हा; बँकेला २२८ कोटींना फसवल्याचा आरोप सीबीआयने घेतली झडती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 05:43 IST2025-12-10T05:43:11+5:302025-12-10T05:43:11+5:30
त्याचसोबत कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पहिल्या प्रकरणात, युनियन बँक ऑफ इंडियाने अंबानी यांच्याकडून २२८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

अनिल अंबानींचा पुत्र जय अनमोलवर गुन्हा; बँकेला २२८ कोटींना फसवल्याचा आरोप सीबीआयने घेतली झडती
नवी दिल्ली/मुंबई : रिलायन्स होम फायनान्स लि. या कंपनीवर संचालक असलेला उद्योगपती अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानी याने बँकांची फसणवूक केल्याप्रकरणी सीबीआयने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी छापेमारी देखील केली. त्याचसोबत कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पहिल्या प्रकरणात, युनियन बँक ऑफ इंडियाने अंबानी यांच्याकडून २२८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. जय अनमोल अंबानी संचालक असलेल्या रिलायन्स होम फायनान्स लि. या कंपनीने युनियन बँकेसह एकूण १८ बँकांकडून ५५७२ कोटी रुपयांच्या कर्जाची उचल केली होती. मात्र, कालांतराने हे कर्ज थकले. बँकेने ३० सप्टेंबर २०१९ रोजी हे कर्ज खाते थकीत कर्ज खाते म्हणून घोषित केले. तर, कालांतराने १० ऑक्टोबर २०२४ रोजी हे खाते घोटाळेबाज खाते म्हणूनही घोषित केले.
अनिल अंबानींचा पुत्र जय अनमोलवर गुन्हा बँकेला २२८ कोटींनी फसवल्याचा आरोप
रवींद्र सुधाळकर यांच्या निवासस्थानी देखील छापेमारी केली. या छाप्यांदरम्यान आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत. संध्याकाळी उशिरापर्यंत हे छापे सुरू होते.
दुसऱ्या प्रकरणामध्ये, बँक ऑफ महाराष्ट्राने रिलायन्स कर्मशियल फायनान्स लि. कंपनीला दिलेल्या कर्जप्रकरणी बँकेची ५७ कोटी ४७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार सीबीआयकडे केली होती. या तक्रारीच्या आधारे सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. कंपनीने ३१ बँका तसेच वित्तीय संस्थांकडून एकूण ९२८० कोटी रुपयांच्या कर्जाची उचल केली होती. हे कर्ज खाते २५ मार्च २०२० रोजी थकीत कर्ज खाते म्हणून घोषित करण्यात आले तर, कालांतराने ४ ऑक्टोबर २०२५ रोजी हे खाते घोटाळेबाज म्हणून घोषित करण्यात आले. या प्रकरणी देखील सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी कंपनीचे संचालक देवांग मोदी यांच्या मुंबई तसेच पुण्यातील निवासस्थानी छापेमारी केली.
घरातून अनेक कागदपत्रे ताब्यात
सीबीआयने न्यायालयाकडून सर्च वॉरंट मिळवून मंगळवारी मुंबई येथील रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडची दोन अधिकृत ठिकाणे, रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडचे तत्कालीन संचालक अनिल अंबानी यांचे पुत्र जय अनमोल अंबानी यांचे निवासस्थान आणि आरएचएफएलचे माजी सीईओ, पूर्णवेळ संचालक रवींद्र सुधाळकर यांच्या निवासस्थानावर छापे टाकले.
सीबीआयने मुंबईतील कफ परेड येथील अनिल अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या सी विंड इमारतीच्या सातव्या मजल्यावरील घरातून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली.