क्राईम
By admin | Updated: July 13, 2015 01:06 IST
़़़ अन्यथा रेती व्यवसायच बंद पाडू
क्राईम
़़़ अन्यथा रेती व्यवसायच बंद पाडूसावाईवेरेतील युवक आक्रमक : निर्धारित वेळेतच रेती वाहतूक करण्याची सूचनाफोंडा : वेरे वाघुर्मे पंचायत क्षेत्रातील रेती वाहतुकीचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे़ वाहतुकीसाठी ठरवलेली वेळ न पाळणारे दोन ट्रक रविवारी (१२) स्थानिक युवकांनी अडवून ट्रकांमधील रेती खाली करून घेतली. यापुढे निर्धारित वेळेत रेती वाहतूक बंद न ठेवल्यास पंचायत क्षेत्रातून वाहतूक करणारे ट्रक अडवू तसेच रेती व्यवसाय बंद पाडू, असा इशारही नागरिकांनी दिला़वेरे वाघुर्मे तसेच वळवई पंचायत क्षेत्रातील रेती वाहतुकीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे़ रेती वाहतुकदारांविरुद्ध स्थानिक युवकांनी जोरदार मोहीम उघडली आहे. मधल्या काळात ग्रामसभेतही हा विषय गाजला होता. या सभेत रेती वाहतूकदारांना वेळेचे बंधन पाळण्याची सूचना करण्यात आली होती़ मात्र, ट्रकचालकांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने स्थानिकांनी याबाबत निवदने दिली; परंतु प्रशासनानेही निवेदनांकडे दुर्लक्ष केेल्याने रविवारी स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेत रेती वाहतूकदारांना निर्णायक इशारा दिला. याबाबत दिनेश नाईक म्हणाले की, रेती वाहतुकीसाठी सकाळी ९ ते दु. १ वा. व दुपारी २ ते सायं. ६ वा. ही वेळ देण्यात आली होती़ सायं़ ६ ते दुसर्या दिवशी सकाळी ९ वा.पर्यंत रेती वाहतूक बंद ठेवण्याची सूचना करण्यात आली़ मात्र, काही दिवस हे नियम पाळल्यानंतर रेती वाहतूकदारांनी मनमानी कारभार करायला सुरुवात केली. त्यामुळे स्थानिक युवकांनी फोंडा पोलिसांना निवेदने दिली, एक-दोन वेळा नियम तोडणार्या वाहनांना अडविले. मात्र, त्यानंतरही रेती वाहतूक सुरूच ठेवण्यात आली आहे.यावर चर्चा करण्यासाठी रविवारी रेती व्यावसायाशी संबंधित वेरे वाघुर्मे, वळवई आणि खांडोळा पंचायतीच्या सरपंचांना बोलाविण्यात आले होते. यात वळवई पंचायतीच्या सरपंचांनी चर्चेस उपस्थिती लावून आपली बाजू मांडली. मात्र, खांडोळा व वेरे वाघुर्मे सरपंचांनी पंचायतीचा चर्चेचा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यामुळे रविवारी दुपारी दीड वाजता खांडोळ्याहून रेती घेऊन आलेले दोन ट्रक स्थानिकांनी अडवले व रेती उतरवून घेतली. शैलेश खेडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेदरकार आणि नियमबा रेती वाहतुकीसंदर्भात विविध सरकारी यंत्रणांना निवेदने देऊ नही आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. स्थानिक युवक रेती व्यवसायाविरुध्द नसून या व्यवसायावर गावातीलच काही लोकांची गुजराण होते, याचेही आम्हाला भान आहे. मात्र, रेती वाहतूक करणार्यांनी निर्धारित वेळेतच वाहतूक करावी़शैलेश खेडेकर म्हणाले की, या रेती व्यवसायात काही नेत्यांचे हात गुंतले आहेत़ त्यामुळे तेही यावर बोलण्यास तयार नाहीत़ आजपर्यंत गावकरीही या व्यवसायात आहेत म्हणून स्थानिकांनी मवाळ भूमिका घेतली होती. मात्र, यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागले़ त्यामुळे आता स्थानिकांची सहनशीलता संपली असून यापुढे गरज पडल्यास रस्त्यावर उतरून संपूर्ण रेती व्यवसायच बंद पाडू, असा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)-------------------------चौकट : सामंजस्याने तोडगा काढूवेरे वाघुर्मे पंचायतीचे सरपंच विनय नाईक यांना विचारले असता त्यांनी आजच्या चर्चेतून फारसे काही निष्पन्न झाले नसल्याचे सांगितले. मात्र, कोणत्याही परिस्थितीत कायद्याचे उल्लंघन होऊ नये याकडे आपले लक्ष आहे़ या समस्येबाबत आपण लवकरच उपजिल्हाधिकार्यांकडे चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. हा विषय सामंजस्याने हाताळण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले.