क्राईम
By Admin | Updated: July 3, 2015 23:00 IST2015-07-03T23:00:06+5:302015-07-03T23:00:06+5:30
कुटबण खून प्रकरणी तपास अधिकार्याची साक्ष

क्राईम
क टबण खून प्रकरणी तपास अधिकार्याची साक्षमडगाव : कुटबण-बेतूल येथील खून प्रकरणी शुक्रवारी तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर यांची साक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांनी नोंदवून घेतली. सरकारी वकील सुभाष देसाई यांनी त्यांची सरतपासणी घेतली.या प्रकरणात २४ मार्च २0१४ रोजी आपण साक्षीदारांची जबानी नोंदवून घेतली. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून घेतली. सर्व मुद्देमाल रासायनिक चाचणीसाठी हैदराबादला पाठविला व अन्य तपासकाम करून आरोपीविरुध्द खुनाच्या गुन्ाबद्दल आरोपपत्र दाखल केल्याचे निरीक्षक देऊलकर यांनी सांगितले.१८ मार्च २0१४ रोजी रात्री ९.१५ वा. आरतोडी, वेळ्ळी येथील डेसमंड फर्नांडिस, कोसेसांव सिमोईस, लिओलिडो पिंटो, जोसली सिमोईस यांनी वेळ्ळी इंडिपेन्डस बारजवळ बेनी कादार्ेज याला बेदम मारहाण करून त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. खटला अंतिम टप्प्यात पोचला आहे. (प्रतिनिधी)