शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

Cricketers Support Wrestlers : ते दृष्य पाहून मन सून्न झालं; विश्वकप विजेता संघ आंदोलक पैलवानांच्या पाठिशी, संयुक्त निवेदन जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 16:15 IST

Wrestlers Protest: 1983 मध्ये भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघाच्या खेळाडूंनी कुस्तीपटूंना पाठिंबा देणारे संयुक्त निवेदन जारी केले आहे.

Cricketers Support Wrestlers: भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंगच्या अटकेच्या मागणीवर ठाम असलेल्या कुस्तीपटूंना आता दिग्गज क्रिकेटपटूंचा पाठिंबा मिळाला आहे. सुनील गावसकर आणि कपिल देव यांच्यासारखे दिग्गज क्रिकेटर कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. 1983 मध्ये भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघाच्या खेळाडूंनी कुस्तीपटूंना पाठिंबा देणारे संयुक्त निवेदन जारी केले आहे. 

आंदोलक कुस्तीपटूंनी मंगळवारी त्यांची पदके गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सर्व कुस्तीपटू हरिद्वारलाही पोहोचले होते, पण शेतकरी नेते नरेश तिकैट यांच्या आश्वासनानंतर कुस्तीपटूंनी पदकं नदीत विसर्जित करण्याचा निर्णय मागे घेतला. त्यांच्या समर्थनार्थ आता दिग्गज क्रिकेटर्स आले आहेत. सुनील गावस्कर-कपिल देवसह दिग्गज क्रिकेटपटूंनी पैलवानांना कोणताही निर्णय घाईत घेऊ नका, असा सल्लाही दिला आहे.

काय म्हणाले क्रिकेटर्स...?

कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ निवेदन देताना 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाने म्हटले की, भारताच्या चॅम्पियन कुस्तीपटूंना मिळालेल्या वागणुकीमुळे आम्ही खूप दुखी आहोत. आमचं मन सुन्न झालंय. यातच आता कुस्तीपटू आपली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेत आहेत, त्यामुळे जास्त काळजी वाटते. अनेक वर्षांची मेहनत, त्याग आणि संयमाने कुस्तीपटूंनी ही पदके मिळवली आहेत. ही देशासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. अशाप्रकारचे निर्णय घाईघाईने घेऊ नयेत. यातून लवकरच काहीतरी तोडगा निघेल, असे दिग्गज क्रिकेटपटूंनी म्हटले आहे.

ब्रिजभूषण यांच्या अटकेच्या ठाम बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक यांसारखे दिग्गज कुस्तीपटू अनेक दिवसांपासून माजी WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात 2 एफआयआर नोंदवल्या आहेत. प्रौढ कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून एक आणि अल्पवयीन कुस्तीपटूंच्या तक्रारीवरुन एक एफआयआर नोंदवण्यात आली आहे. पण, अद्याप ब्रिजभूषण यांना अटक किंवा पुढील कोणतीच कारवाई झाली नाही. यावरुन देशभरात संतापाची लाट आहे.

टॅग्स :Wrestlingकुस्तीagitationआंदोलनKapil Devकपिल देवSunil Gavaskarसुनील गावसकर83 Movie८३ सिनेमा