शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

क्रिकेट मॅच फिक्सिंग हा 420 चा गुन्हा ठरत नाही - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 07:15 IST

कर्नाटक उच्च न्यायालय

खुशालचंद बाहेतीबंगळुरू : क्रिकेटची मॅच फिक्सिंग फसवणूक होत नाही. जर एखादा खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये गुंतला असेल, तर खेळप्रेमींची त्याने फसवणूक केली अशी प्रेक्षकांमध्ये सर्वसाधारण भावना निर्माण होईल. परंतु, ही भावना ४२० आयपीसीचा गुन्हा होत नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीनिवास हरीश कुमार यांनी म्हटले आहे. 

नोव्‍हेंबर २०१९ मध्‍ये दुसर्‍या एका प्रकरणात चौकशीदरम्यान गुन्हे शाखा बेंगळुरूला ऑगस्ट २०१९ मध्‍ये खेळण्‍यात आलेल्‍या कर्नाटक प्रीमियर लीगमध्‍ये खेळाडूंनी मॅच फिक्सिंग केल्‍याची माहिती मिळाली. यावर अबरार काझी, २ खेळाडू आणि एका फ्रँचायझी मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला. पोलिसांनी कलम ४२० (फसवणूक) आणि कलम १२० (ब) (षड्यंत्र) आयपीसी अंतर्गत आरोपपत्र दाखल केल्यानंतर, अबरार काझी आणि इतरांनी आरोपपत्र रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली.

फिर्यादी पक्षाचे मुद्दे : सामना पाहण्यासाठी लोक तिकीट खरेदी करतात. ते एक निष्पक्ष खेळ पाहतील अशी त्यांच्या मनात अपेक्षा असते. मॅच फिक्सिंग झाल्यास, निकाल पूर्वनिर्धारित असतो आणि कोणताही निष्पक्ष खेळ होत नाही. त्यामुळे लोकांची फसवणूक होते.

उच्च न्यायालयाचे मत :१. ४२० आयपीसीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी, आवश्यक आवश्यक आहे फसवणूक व कोणत्याही संपत्तीच्या विनियोगासाठी अप्रामाणिक प्रलोभन.२. पैसा ही संपत्ती आहे; पण दर्शकांना तिकीट खरेदी करण्यास प्रवृत्त केले जाते हा युक्तिवाद मान्य करता येणार नाही.३. दर्शकांना असे वाटत असेल की ते निष्पक्ष खेळ पाहतील; परंतु ते स्वेच्छेने तिकिटे खरेदी करतात. त्यामुळे तिकीट खरेदीसाठी प्रलोभनाचा प्रश्नच येत नाही.

४. मॅच फिक्सिंग हा खेळाडूंचा अप्रामाणिकपणा, अनुशासनहीनता आणि मानसिक भ्रष्टाचार दर्शवते . ५. यासाठी शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचा अधिकार बीसीसीआयला आहे.६. बीसीसीआयच्या उपविधींमध्ये खेळाडूंविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद असल्यास, अशा कारवाईला परवानगी आहे परंतु या साठी ४२० अंतर्गत एफआयआर नोंदवता येणार नाही.

७. कर्नाटक पोलीस कायद्याचे कलम २(७) स्पष्टपणे सांगते की संधीच्या खेळामध्ये कोणताही ऍथलेटिक खेळ किंवा खेळ समाविष्ट नाही. क्रिकेट हा एक खेळ आहे आणि त्यामुळे बेटिंग जरी होत असली तरी कर्नाटक पोलीस कायद्यातील 'गेमिंग'च्या व्याख्येत तो बसु शकत नाही.( सीआरएल. पी. नं. २९२९/२०२०)

बचाव पक्षाचा युक्तिवाद :मॅच फिक्सिंगमध्ये खेळाडूंचा सहभाग आहे असे गृहीत धरले तरी तो ४२० आयपीसी अंतर्गत फसवणूक केल्याचा गुन्हा ठरणार नाही.फारतर हा बीसीसीआयने खेळाडूंना दिलेल्या आचारसंहितेचा भंग आहे. यात बीसीसीआयकडून कारवाई होऊ शकते.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ