शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
2
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
3
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
4
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
5
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
6
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
7
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
8
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
9
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
10
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
11
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
12
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
13
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
14
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
15
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
16
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
17
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
18
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
19
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
20
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल

2025 पर्यंत देशात 10 कोटी रोजगार, CII ने दाखवला आशेचा किरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 14:50 IST

देशात 2025 पर्यंत 10 करोड रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा कन्फेडरेशन ऑफ इंडीयन इंडस्ट्री (सीआयआय) या संस्थेने केला आहे. केंद्र सरकारकडून रोजगार निर्मिती करण्यासाठी अनेक सुधारणा आणि योजना लागू करण्यात आल्यामुळे नवीन व्यवसाय उभे राहू लागलेत

नवी दिल्ली - देशात 2025 पर्यंत 10 करोड रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा कन्फेडरेशन ऑफ इंडीयन इंडस्ट्री (सीआयआय) या संस्थेने केला आहे. केंद्र सरकारकडून रोजगार निर्मिती करण्यासाठी अनेक सुधारणा आणि योजना लागू करण्यात आल्या त्यामुळे नवीन व्यवसाय उभे राहू लागलेत. हेच व्यवसाय आगामी काळात देशातील बेरोजगारांसाठी आशेचा नवा किरण ठरणार आहेत. नव्याने निर्माण होणाऱ्या या व्यवसायांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळून वेगवेगळ्या 8 क्षेत्रांमध्ये 10 करोड लोकांना नवीन रोजगार मिळणार आहे. 

सीआयआयचे अध्यक्ष राकेश भारती मित्तल यांनी सांगितले की, देशात नव्याने स्टार्टअप उद्योग आणि कौशल्य विकासाला चालना मिळाल्यामुळे अनेक रोजगाराचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्याचसोबत रोजगाराच्या गुणवत्तेतही वाढ होत असल्याचे सांगण्यात आले. व्यवसायांमध्ये सुलभता आणण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. त्यामध्ये लघु उद्योगांसाठी असलेल्या करांमध्ये 25 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. तसेच व्यवसायासाठी लागणाऱ्या व्याजदर घटवल्याने लघु उद्योजकांना उद्योगासाठी चालना मिळाली. त्यामुळे या उद्योगात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. 

राकेश मित्तल यांनी केंद्र सरकारने उद्योगांसाठी चालना दिल्याने रोजगार निर्मिती वाढली असं सांगताना ईपीएफओच्या आकडेवारीचा हवाला दिला. ईपीएफओमध्ये सप्टेंबर 2017 ते डिसेंबर 2018 या दरम्यान जवळपास 72 लाख नवीन नोकरदार वर्ग जोडल्याचे सांगितले. 

कोणकोणत्या क्षेत्रात होणार रोजगार निर्मिती ?

सीआयआयने ज्या 8 क्षेत्रांचा उल्लेख करून 10 करोड रोजगार निर्मितीचा दावा केला आहे त्यामध्ये रिटेल व्यवसाय, बांधकाम व्यवसाय, परिवहन आणि साधन सामुग्री विभाग, पर्यटन व्यवसाय, कापड व्यवसाय, टेक्सटाइल इंडस्ट्री, फूड प्रोसेसिंग आणि वाहन व्यवसाय यांचा समावेश केला आहे. 

सीआयआयने हा दावा केला असला तरी, मागील महिन्यात नॅशनल सँपल सर्व्हे ऑर्गनायझेशनने अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालातून गेल्या 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी यंदाच्या वर्षात वाढली असल्याचं स्पष्ट झालं होतं.  त्यानंतर, मोदी सरकारवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. तर, मोदी सरकारने हा अहवाल चुकीचा असल्याचं म्हटलं होतं. नोटबंदी आणि जीएसटी या निर्णयाचा लहान-सहान उद्योगांना फटका बसला होता. त्यामुळे बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचं सांगण्यात येत होते.  

टॅग्स :jobनोकरीIndiaभारतGovernmentसरकार