शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

त्रिपुरात हिंसाचार; सीपीएमच्या कार्यालयांना आग, पक्षाचा भाजपच्या जमावावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 00:48 IST

भाजपकडून आरोपांचं खंडन.

ठळक मुद्देभाजपकडून आरोपांचं खंडन.

त्रिपुरामधील कथलिया येथे बुधवारी भारतीय जनता पक्षाच्या मिरवणुकीत कथितरित्या हिंसाचार घडला. मिरवणुकीत सहभागी झालेल्यांनी माकप कार्यालयाची तोडफोड केली आणि तेथे उभ्या असलेल्या वाहनांना लक्ष्य केले. केंद्रीय राज्यमंत्री आणि त्रिपुरा पश्चिम मतदारसंघातील भाजप खासदार प्रतिमा भौमिक त्या मिरवणुकीचं नेतृत्व करत होत्या, ज्यामध्ये मोठा हिंसाचार घडला, अशी प्रतिक्रिया यानंतर माकपचे नेते बिजन धर यांनी दिली.

"प्रतिमा भौमिक यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आपल्या पक्षाच्या कार्यालयाला लक्ष्य करण्याक आलं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या स्थानिक समितीच्या अडीच वर्षांपासून बंद असलेल्या कार्यालयात तोडफोड केली. त्या ठिकाणी असलेल्या एका वाहनाला देखील आग लावली," असं बिजन धर म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधत कारवाईचीदेखील मागणी केली आहे.  दरम्यान, भाजपनं या सर्व आरोपांचं खंडन केलं. "या हिंसाचारादरम्यान आपण मुख्य सचिव कुमार आलोक आणि वरिष्ठ पोली अधिकाऱ्यांतडे मदत मागितली. परंतु अनेक ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली नाही. जवळपास एकावेळ ८-१० ठिकाणी भाजपच्या लोकांनी हिंसाचार केला," असा आरोप त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी केला.  भाजपकडून माणिक सरकारवर आरोपभाजप प्रवक्ता नबेंदु भट्टाचार्जी यांनी माणिक सरकारवर "शांततापूर्ण राज्यात हिंसाचार भडकावण्याचा" आरोप केला. "सोमवारी माणिक सरकार यांनी आपलं विधानसभा क्षेत्र धनपुरचा दौरा करताना सीपीएम कार्यकर्त्यांना भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यासाठी उकसवलं होतं. माकपच्या कार्यकाळात २५ वर्षांमध्ये जो हिंसाचार नियमित झाला तो राजकीय हिंसाचार लोकांना आता नकोय," अशी प्रतिक्रिया भट्टाचार्जी यांनी दिली.   

टॅग्स :Tripuraत्रिपुराBJPभाजपाPoliceपोलिस