CPI-M leader Sitaram Yechury's son dies of Covid-19 in Gurgaon | सीताराम येचुरींच्या मुलाचे कोरोनामुळे निधन, मेदांता रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास 

सीताराम येचुरींच्या मुलाचे कोरोनामुळे निधन, मेदांता रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास 

ठळक मुद्देआशिष येचुरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते.

नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे पुत्र आशिष येचुरी यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. ते ३४ वर्षांचे होते. त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. आशिष येचुरी यांच्या निधनाची माहिती सीताराम येचुरी यांनी दिली आहे. (CPI-M leader Sitaram Yechury's son dies of Covid-19 in Gurgaon)

आशिष येचुरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, गुरूवारी सकाळी सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आशिष येचुरी यांच्या निधनाची माहिती सीताराम येचुरी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

याचबरोबर, आशिष येचुरी यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे सीताराम येचुरी यांनी ट्विटद्वारे आभार मानले आहेत. दरम्यान, आशिष येचुरी हे पत्रकार होते. दिल्लीतील एका वृत्तपत्रात सिनिअर कॉपी एटिडर म्हणून ते काम करत होते.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे तीन लाख १५ हजार नवे रुग्ण आढळले आहे. तर २१०२ लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CPI-M leader Sitaram Yechury's son dies of Covid-19 in Gurgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.