शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

सोन्याचा अंश असल्यानेच गायीचे दूध पिवळसर, भाजप नेत्याचे तर्कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 07:00 IST

भाजप नेत्याचे तर्कट; कुत्र्याचे मांस खाण्याचा बुद्धिवंतांना सल्ला

कोलकाता : सोन्याचा अंश असल्यानेच गायीच्या दुधाचा रंग पिवळसर असतो, असे अजब तर्कट भाजपचे पश्चिम बंगालचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी लढविले आहे. केंद्र सरकारने घातलेल्या बंदीचा निषेध करण्यासाठी समाजातील काही बुद्धिवंत अजूनही गोमांस खात असून त्यांनी त्यापेक्षा कुत्र्याचे मांस खावे, असेही तारे घोष यांनी तोडले आहेत.

बर्दवान येथे सोमवारी एका जाहीर सभेत त्यांनी ही वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. दिलीप घोष म्हणाले की, देशी गायींच्या पाठीवर वाशिंड असते. विदेशी गायींची पाठ वाशिंडाविना व सपाट असते. वाशिंडामध्ये ‘स्वर्णनारी’ असते. जेव्हा त्यावर सूर्यप्रकाश पडतो तेव्हा त्यातून सोने निर्माण होते. त्यामुळेच देशी गायीचे दूध पिवळसर किंवा साधारण सोन्याच्या रंगाचे असते. एखादा केवळ देशी गायीचे दूध पिऊनही नीट जगू शकतो. असे अनेक साधुसंत आहेत की जे केवळ गायीच्या दुधावर जगतात.दिलीप घोष यांनी सांगितले की, समाजातील सुशिक्षितांपैकी काही लोक रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने, गाड्यांवर गोमांसापासून केलेले पदार्थ खातात. त्यांनी फक्त गोमांसच नव्हे तर कुत्र्याचेही मांस खावे. त्यांनी इतरही प्राण्यांचे मांस खायला हरकत नाही. ते प्रकृतीला नक्कीच चांगले असते असे उपरोधिकपणे नमूद करून ते म्हणाले की, कुठल्याही प्राण्याचे मांस खा; पण हे सगळे उद्योग त्या लोकांनी आपापल्या घरात करावेत. गाय ही आमची माता आहे व तिची हत्या करणे हा सामाजिक अपराध आहे, असे आम्हाला वाटते. (वृत्तसंस्था)पोलिसांनाही धडा शिकवणारच्दिलीप घोष म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांवर खोटी कारवाई करणाऱ्या पोलिसांवर आमचा पक्ष पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आल्यानंतर कारवाई करणार आहे. च्भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्याखाली तुरुंगात डांबण्यात आले आहे.च्ही कारवाई व ती करणाऱ्यांवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. भाजपच्या पक्षकार्यकर्त्यांचा छळ करणारे पोलीस निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या पेन्शनमधून भरपाई म्हणून काही रक्कम कापून घेण्यात येईल.

टॅग्स :milkदूधcowगायGoldसोनंBJPभाजपा